देसूर हायस्कूलमध्ये आंतरशालेय चित्रकला-हस्तकला स्पर्धा उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
देसूर येथील देसूर हायस्कूलमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धा व हस्तकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष गंगाराम मजुकर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सुरेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पी. आर. पाटील होते.
प्रारंभी ईशस्तवन आणि स्वागतगीत झाले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक जे. एस. पाटील यांनी केले. चित्रकला स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम श्रेया भातकांडे, द्वितीय प्रणव पाटील, तृतीय प्रशांत पाटील यासह उत्तेजनार्थ विठ्ठलराम नाईक, रतनसागर भुजबळ आदींना गौरविण्यात आले. याबरोबर हस्तकला स्पर्धेत अनुक्रमे प्रथम निखिल देसाई, द्वितीय रोहिणी पाटील, तृतीय किशोर गावडे, उत्तेजनार्थ प्राप्ती पाटील, प्रतीक्षा नायकोजी यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
याप्रसंगी एस. एन. जाधव यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश कुरंगी यांनी केले. तर व्ही. टी. कुकडोळकर यांनी आभार मानले.