आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या! शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
चोरीचा गुन्हा उघड करून 6 लाख 44 हजारांचा मुद्देमाल हस्तगत! संशयित चार महिला व दोन पुरूष जेरबंद
सातारा प्रतिनिधी
शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरी करणाऱ्या परजिह्यातील 4 महिला व 2 पुरुष यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन 6 मोबाईल, गुह्यात वापरत असलेले वाहन व रोख रक्कम असा एकुण 6 लाख 44 हजार 970 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघकीस आणला आहे. अल्ताफ सय्यद पठाण (वय 24, रा. विहा मांडवा ता. पैठण जि. संभाजीनगर), रमेश बाबासाहेब काळे (वय 34, रा. येळंबघाट ता.जि.बीड), जान्हवी अंगद पवार वय.28, रा. रामगव्हाण ता. अंबट जि. जालना), बरका सचिन पवार (वय 28, रा. वाडेगोद्री ता. अंबट जि. जालना), गवरी रामदास भोसले (वय 27 वर्षे रा. गेवराई ता. जि. बीड), सुरेखा ज्ञानेश्वर काळे (वय 23, रा. वाडेगोद्री ता. अंबट जि. जालना) अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे रविवारी गणपती उत्सवाच्या अनुषंगाने राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक अशा परिसरात गर्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यांना 4 संशयित महिला फिरत असल्याचे दिसुन आल्या. त्यांच्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अंमलदार यांनी बारकाईने लक्ष ठेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात असलेल्या सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले. या फुटेजमधील दोन महिला या फुटेजमधील असल्याची खात्री झाल्याने महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, प्रियांका बाबर व महिला अंमलदार यांची मदत घेवुन या ठिकाणी 4 संशयित महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने बाजारपेठेत फिरत असल्याचे सांगुन त्यांचे आणखी 2 पुरुष साथीदार वाढे फाटा याठिकाणी चारचाकी वाहन घेऊन थांबले असल्याचे सांगितले.
या महिलांसोबतचे दोन पुरुष साथीदार यांना मोबाईल लोकेशनच्या आधारे ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात हजर केले. त्यांनी चार महिलांच्यासोबत सन 2023 मध्ये चोरी केल्याचे कबुल केले. तसेच ते संगनमताने अशाच प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे कबूल केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले व प्रियांका बाबर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, निलेश काटकर, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, महिला पोलीस अंमदार सोनाली माने, धनश्री यादव, तनुजा शेख, शकुंतला पाटोळे, कोमल पवार यांनी केली आहे. या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गुरव हे करीत आहेत.