आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेला प्रारंभ
10:14 AM Nov 20, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आरपीडी कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालय टिळकवाडी आयोजित बेळगाव जिल्हा अंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला हॉकी स्पर्धेला आरपीडी मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य आणि स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष आनंद सराफ यांच्या हस्ते हॉकी स्टिकने चेंडू फटकावून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.अभय पाटील, क्रीडा प्राध्यापक एन रामकृष्ण व क्रीडा प्राध्यापक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article