For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुजाण पा(बा)लकत्व

06:26 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
सुजाण पा बा लकत्व
Advertisement

‘सुजाण पालकत्व’ हा आजच्या युगातील पालकांसाठी असलेला परवलीचा शब्द. या शब्दांमधला अभिप्रेत असलेला अर्थ पालक-पाल्यांमध्ये एक तरल, सुखद नाते दर्शवितो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला संधी देणारे, मुलांवर अनावश्यक अपेक्षांचे ओझे न लादणारे, मुलांना त्यांच्या कलाने वाढू देणारे, योग्य त्या ठिकाणी योग्य ते वळण लावणारे, मुलांना समजून घेणारे, मुलांमध्ये वेळ प्रसंगी मूल होणारे, मुलांप्रमाणे वेळप्रसंगी वागणारे, मुलांना शिकवता शिकवता स्वत:ही शिकणारे, मुलांच्या यशातच नव्हे तर मुख्यता: अपयशात स्वत:चा तोल ढळू न देणारे पालकत्व हे सुजाण पालकत्व होय!

Advertisement

पुनऊत्पादन ही नैसर्गिक  प्रक्रिया आहे. आपला वंश वाढावा म्हणून अपत्य जन्माला घालणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे. माणसाबरोबर निसर्गातील इतर प्राणी या प्रेरणेने पुनऊत्पादन करतात. पण माणूस आणि इतर प्राणी यामधला एक सर्वात मोठा फरक म्हणजे माणूस ‘विचारी’ आहे म्हणजेच विचार करू शकतो. नैसर्गिक प्रेरणे इतकाच ‘पालक’ होण्यास/होण्यात अनेक विचारांचा, आचारांचा कंडिशनचा भाग आहे.

आपल्या भोवताली जरा पाहिल्यास, ऐकल्यास आयुष्यात एक मूल आणण्यासाठी मग ते बायोलॉजिकली असो, दत्तक घेऊन असो. एक किंवा अनेक पॅक्टर्स असतात यामध्ये लहान मुलांची अत्यंत आवड, आपल्यानंतर आपले नाव/घराणे पुढे नेणारी/नेणारा, मुल होणे म्हणजेच कुटुंब पूर्ण होणे हा विचार/समज, घरातल्यांचा, सोसायटीचा (समाज या अर्थाने) दबाव, नवरा बायकोमध्ये रोज भांडण होत असल्यास ’एक मूल झालं’ की आपोआप भांडणे मिटतील हा विचार/सल्ला, मूल झाले नाही तर आपल्यात काही ‘कमी’ आहे हा विचार, म्हातारपणाचा आधार/ काठी.

Advertisement

आपल्याला मुल असावे या नैसर्गिक प्रेरणेव्यतिरिक्त आयुष्यात मूल असण्याला वरीलपैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात. पण बघा हा... मूल व्हावे, पालक व्हावे हे फक्त पालकांच्या इच्छेने आणि क्रियेने होते, मुलाच्या इच्छेने होत नाही ना? मग मूल मोठे झाल्यावर ती पालकांच्या मनासारखी वागत नसली की ‘आम्ही तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं, तुझ्यासाठी इतकं केलं..आम्ही तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या तुला नाही माहीत... तुला त्याची किंमत नाही...’ इत्यादी डायलॉग पालकांनी मारावेत का? याचा अर्थ पालकांनी मुलांना ओरडू नये, समज देऊ नये असे नाही आहे. समजा, पालक म्हणून तुम्हाला एक प्रŽ विचारला ‘तुम्ही आयुष्यात चुका केल्या आहेत का? केल्या आहेत. माणूस आहे चुका होणारच.’ पण असा प्रŽ विचारला ‘तू आयुष्यात एक पालक म्हणून चुका केल्या आहेत का?’ जेवढं पटकन उत्तर पहिल्या प्रŽाचे दिले तेवढ्याच स्पीडने दुसऱ्या प्रŽाचे उत्तरही ‘हो’ म्हणून किती जण देतील? पालक हा पण माणूस असतो.

पालक असण्याचे ओझे बरेचदा वागवत राहतात आणि बरेचदा ते ओझे स्वत:च वागवतात असेच नाही तर स्वत:कडून असलेल्या अपेक्षांचे ओझे नकळत मुलांच्या माथीही मारले जाते. ‘मला त्यावेळी शिकायला मिळालं नाही म्हणून पोराने शिकावं. मोठं व्हावं अशी खूप इच्छा होती. माझी ऐपत नसतानाही इतके पैसे भरून तुला अमुक-अमुक कोर्सला अॅडमिशन घेऊन दिली आणि तू नापास झाला/झालीस? वर म्हणतोस की मला पुढे हे करायचं नाही?’

हा डायलॉग फार फिल्मी नसावा. कधी ना कधी आपल्या घरात, आजूबाजूच्या घरात कोणीतरी पालकांनी आपल्या मुलाला/मुलीला असे म्हटलेले आठवत असेल. वडिलांचा हेतू त्याच्या अनुषंगाने चांगला असूनही बऱ्याच अंशी मुलांचे नुकसानच होते. इंजिनियरिंग करायची बुद्धिमत्ता असूनही निव्वळ वयोपरत्वे अंगी असलेल्या बेदरकारपणामुळे अभ्यास न करणाऱ्या मुलाबद्दल म्हणत नाही. ती केस वेगळी. पण खरोखर इंजिनियरिंग करायची इच्छा नाही, त्यात गती नाही तरी घरच्यांची इच्छा म्हणून एखाद्या स्ट्रीमला जाणारी मुलं आहेत. विषयाची आवड नसते, गती नसते, कॉलेजला गेल्यावर इतर आकर्षणे असतात ती वेगळी. मुले वहावत जातात. घरी काही बोलायला गेलं तर हे ऐकायला मिळतं. रडत खडत, नापास होत, कधी इंजिनियरिंग मध्येच सुटून जाते तर कधी चार ऐवजी सहा वर्षे लागतात. वर्षाचा ड्रॉप लागला की आपल्या बरोबरचे मित्रमैत्रिणी पुढच्या वर्गात निघून गेल्याचे शल्य असते. पुढल्या खेपेत पास व्हायच्या विषयांचा ढीग असतो. वर्ग जुना, वर्गातले मात्र नवीन, त्यांनी समजून ग्रुपमध्ये घेण्याचे चान्सेस कमी.

आपण नापास होऊन इथेच बसलेलो आहोत या भावनेने कोणाशी मैत्री करायची इच्छा होत नाही. कॉलेजला जावेसे वाटत नाही. इंजिनियरिंग तसेही आवडत नसते, आता तिरस्कार निर्माण होतो. या सगळ्या गडबडीत घरून समजून घेण्याची शक्मयता शून्य.या मुलाचा न्यूनगंड वाढत जातो. जोवर त्याला दुसरीकडे कुठेतरी, ज्यात त्याला आवड आहे, त्याची क्षमता आहे तिथे ब्र्रेक मिळून त्याला सूर गवसत नाही तोवर आपण एक पराभूत आहोत ही भावना मनातून जात नाही. घरी जरी ब्र्रेव्ह फ्रंट दाखवत तो आईबाबांशी भांडत असला तरी आतली सल जात नाही.

आपण पालक आहोत आणि आपल्या मनात आपल्या मुलांचे फक्त हित आहे म्हणून आपल्याकडून चुका होणार नाहीत असे नाही. आपण पालक असलो तरी माणूस आहोत आणि चुका करू शकतो हे एकदा स्वीकारले की चुका लक्षात येऊन त्यात सुधारणा करण्याची शक्मयता जास्त असते. ’ध्हम a ज्arाहू, aत्waब्s a ज्arाहू’ पालकत्व न संपणारे आहे ते काळानुसार मुलांच्या गरजेनुसार विकसित होत राहिले तर त्यात खरा चार्म आहे. मी आज या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला कारण मानसिक आरोग्य विभागात काम करताना समुपदेशनामध्ये आलेले अनुभव मांडण्याचा हा प्रयत्न.

मुलांनी घेतलेला निर्णय प्रत्येकवेळी हवा तोच रिझल्ट देईल का माहीत नाही. पण पालकांनी घेतलेल्या निर्णयाचा रिझल्ट तरी 100 टक्के कुठे लागतो? फक्त काही उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले म्हणून सगळे ज्ञान असते, सगळे बरोबर असते असे नाही. अनुभव, त्यातून घेतलेला बोध, आलेले शहाणपण या गोष्टी सापेक्ष असतात. आणि म्हणून मुलांच्या हातात त्यांच्या आयुष्याचे स्टिअरिंग व्हील जितक्मया लवकर देता येईल तितके द्यावे. ते कधी, वयाची किती वर्षं झाल्यावर माहीत नाही. ते प्रत्येक पालकावर, पाल्यावर अवलंबून आहे.

आपला पाल्य लवकरात लवकर स्वावलंबी होईल हे त्याच्या जन्मापासून पालकाच्या मनात असावे आणि त्याची मशागत तेव्हापासून करावी. बाळाचे पाय पळण्यात दिसतात, त्याचे निरीक्षण आवर्जून करावे. पाल्याच्या वाढीसोबत पालकाच्या वाढीचा प्रवास समांतर व्हावा.

‘पालकत्व डोळस आणि प्रवाही असावे.’

रेश्मा भाईप

Advertisement
Tags :

.