महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनुदानित शैक्षणिक संस्थांना ‘अॅक्सिस’ खाते उघडण्याचे निर्देश

11:07 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेळेत आणि निर्धारित वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या गुऊदक्षिणा योजनेनुसार आता पुन्हा सर्व अनुदानित शैक्षणिक संस्थांना अॅक्सिस बँकेत खाती उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे.गेल्यावर्षी ही योजना जाहीर केली होती, मात्र आतापर्यंत अनेक संस्थांनी अॅक्सिस बँकेत खाती उघडलेली नाहीत. त्यामुळे शिक्षण संचालकांनी पुन्हा परिपत्रक जारी करुन सर्व अनुदानित शैक्षणिक संस्थांना अॅक्सिस बँकेत खाती उघडण्याचा आदेश दिला आहे. राज्यात सुमारे 570 अनुदानित शैक्षणिक संस्था असून, शिक्षण खात्याच्या आदेशानुसार या सर्वांना आता अॅक्सिस बँकेत खाती उघडावी लागणार आहेत.

Advertisement

योजनेअंतर्गत सरकारने केवळ अनुदानित शैक्षणिक संस्थांनाच अॅक्सिस बँकेत खाती उघडण्याचे आदेश दिले आहेत. या संस्थांमधील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना मात्र त्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला विरोधी आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावरून सरकारवर आरोपबाजी केली आहे. राज्य सरकार या निर्णयाद्वारे खासगी बँकांना पाठबळ देत असून, सरकारी बँका संपवण्याचा घाट सरकारने घातल्याची टीका त्यांनी केली आहे. आमदार कार्लुस फेरेरा यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article