For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमेदवारांना खर्चाचा तपशील देण्याची सूचना

11:16 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
उमेदवारांना खर्चाचा तपशील देण्याची सूचना
Advertisement

जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 77 नुसार निवडणूक प्रचार कालावधीमध्ये आपल्या  निवडणुकीच्या खर्चाची माहिती निवडणूक विभागाच्या खर्च निरीक्षकांकडे सादर करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली. उमेदवारांनी आपल्या बँक खात्याचे पासबुक याबरोबर खर्चाचा तपशील या संदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे स्वत: अथवा आपल्या निवडणूक एजंटांच्या माध्यमातून सादर करण्याची सूचना केली आहे. 02 बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहामध्ये तीन दिवस सकाळी 10 ते 5 या कालावधीत आपला हिशोब अहवाल देण्याची सूचना केली आहे. पहिली छाननी 26 एप्रिल 2024, दुसरी छाननी 30 एप्रिल 2024, तिसरी छाननी 4 मे 2024 अशा प्रकारे तीन टप्प्यातील हिशोब देण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी निश्चित करण्यात आलेल्या तारखेनुसार माहिती देण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.