For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकवाड येथील लक्ष्मी देवीची गदगेवर स्थापना

10:48 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकवाड येथील लक्ष्मी देवीची गदगेवर स्थापना
Advertisement

देवीची गावातून मिरवणूक : भाविकांचा सहभाग

Advertisement

वार्ताहर /नंदगड

बेकवाड (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव बुधवारपासून सुरू झाला आहे. बुधवारी पहाटे देवीचा विवाह सोहळा, त्यानंतर दोन्ही देवींची गावातून मिरवणूक व घरोघरी ओट्या भरण्याचा कार्यक्रम झाला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता देवीची गदगेवर स्थापना करण्यात आली. बेकवाड येथे लक्ष्मी देवीच्या दोन लाकडी मूर्ती आहेत. त्यापैकी एक सिंहावर बसलेली उजव्या बाजूला व वाघावर बसलेली डाव्या बाजूला, मंदिराप्रमाणेच गदगेवरही त्याचप्रमाणे स्थानापन करण्यात आली आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने रात्री 2 वाजेपर्यंत गावात भाविकांसह लोकांची मोठी गर्दी झाली होती.

Advertisement

देवीच्या दर्शनासाठी गर्दी

गदगेवर स्थानापन केलेल्या दोन्ही लक्ष्मी देवीचे दर्शन रात्री उशिरापर्यंत भाविक घेताना दिसत होते. त्यात प्रामुख्यांने पुरुष वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तर गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर अनेक भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. त्यात महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

Advertisement
Tags :

.