महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जलस्रोतमंत्र्यांकडून शिवोलीत पडीक शेत जमिनीची पाहणी

12:03 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /शिवोली

Advertisement

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी नुकतीच शिवोलीत भेट दिली. सडये तसेच मार्ना शिवोली भागाला जोडणाऱ्या रस्त्यांना लागून असलेल्या पडीक जमिनीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सडये सरपंच दीपा पेडणेकर, अभियंते, शेतकरी व इतर उपस्थित होते. आमदार डिलायला लोबो यांनी या पडीक शेतांबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आपण सौ. लोबो यांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. चिंचोणे येथील शेतकऱ्यांनी सुमारे 10 लाख चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन लागवडीखाली आणली आहे. या भागातील काही शेतकरी शेताची लागवड करीत नाही. येथील शेतकऱ्यांनी आपसात असलले भेदभाव बाजूला ठेवून शेत जमीन लागवडीखाली आणण्यासाठी राबावे. त्यांनी जलस्रोत खात्यातर्फे लागेल ती मदत करू असे आश्वसन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले. 26 डिसेंबरपासून शेतात शेतीयंत्रे घालून वाढलेली झाडेझुडपे काढून टाकणार तसेच वेळ पडल्यास पाण्याच्या निचऱ्यासाठी नाला तयार करण्यात येणार आहे, असे  शिरोडकर यांनी पुढे नमूद केले.

Advertisement

शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावणार : डिलायला लोबो

गेल्या पंधरा वीस वर्षांपासून शेतात वाढलेल्या रानमोडीमुळे शेतकरी लागवड करू शकले नाहीत. शेकडो एकर शेती विनालागवड पडीक राहिली. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना आपण त्यानुसार कळविले होते व त्यांनी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा कऊन त्यांचे प्रश्न तडीस लावणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘हॉटमिक्सिंग’ प्लांटचे उद्घाटन झाल्यानंतर सडये-मार्ना लिंक रस्त्याचे हॉटमिक्सिंग करण्यात येणार आहे, असे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article