For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी

10:06 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी
Advertisement

भिंतीचे योग्य पद्धतीने बांधकाम करण्याची कंत्राटदाराला सूचना

Advertisement

खानापूर : खानापूर येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या हायटेक बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी समोरील बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या संरक्षक भिंतीचे काम योग्यपद्धतीने होत नसल्याची तक्रार ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करून संरक्षक भिंतीचे काम थांबविले होते. याची दखल घेत परिवहन मंडळाचे तांत्रिक विभागाचे अभियंते तिम्मा रे•ाr आणि दिनेश यांनी गुरुवारी खानापूर येथील बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी केली. आणि संरक्षक भिंती कॉलम योग्य पद्धतीने उभारुन बांधकाम करण्याची सूचना कंत्राटदाराला केली आहे. याबाबत विनायक मुतगेकर यांच्या निदर्शनास आणून कॉलम उभे करण्यात यावे, असेही यावेळी तिम्मा  रे•ाr यांनी सूचित केले आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे काम योग्य पद्धतीचे होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.