महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चोडण येथील संरक्षक भिंतीची आमदारांकडून पाहणी

12:26 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गावोणा येथील कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसह पूर्ण साकवाचे नव्याने बांधकाम करण्याचे आश्वासन

Advertisement

वार्ताहर/जुने गोवे 

Advertisement

गावोणा चोडण येथील जोल्लो व्हाळच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीची आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पाहणी केली. सदर जोल्लो व्हाळच्या साकवाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच प्रक्रिया सुरू झाली होती पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष कामाला सुऊवात करता आली नाही.आता लवकरच कामाला सुऊवात करून संरक्षक भिंतीसह नवीन साकवाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.सध्या या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आमदारांनी चोडण माडेल पंचायतीला महत्त्वाच्या सूचना केल्या.

यावेळी चोडणचे सरपंच रवींद्र किनळकर, उपसरपंच वेल्डा कुलासो, पंचसदस्य संजय कळंगुटकर, रमाकांत प्रियोळकर, पांडुरंग वायंगणकर, जयंती नाईक, माजी सरपंच दिव्या उसापकर, माजी पंचसदस्य सावियो कुलासो, चोडण विकास समितीचे अध्यक्ष मनोज महाले, स्वयंसेवी संस्था हेल्पिंग हँड्स ग्रुपचे आग्नेलो फुर्तादो, महेश आमोणकर, देवेंद्र उसापकर आदी उपस्थित होते. दरम्यान, तिखाजन हातुर्लीमार्गे माडेल फेरीबोटीकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत साऊद-चोडण येथील स्टेट बँकेच्या जंक्शनकडून पांडववाडा, बेलभाट, काराभाट केरे-सिरसाठ यामार्गे प्रवास करावा, असे आवाहन सरपंच रवींद्र किनळकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article