महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मृणाल हेब्बाळकर यांच्याकडून खड्डेमय रस्त्याची पाहणी

10:44 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगरमधील रस्त्यांची दिवाळीनंतर दुरुस्तीचे आश्वासन : घर कोसळलेल्यांनाही मदत

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

Advertisement

ग्रामीणच्या आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी रविवारी कंग्राळी बुद्रुक येथील कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर खड्डेमय रस्त्याची पाहणी केली. तसेच अतिवृष्टीमुळे गावातील कोसळलेल्या घरांचीही पाहणी केली. शासनाकडून घरे कोसळलेल्या नागरिकांना जास्तीत जास्त निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच खड्डेमय रस्त्याची सध्या तात्पुरती डागडुजी करून दिवाळीनंतर सदर रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पाणी समस्या व गावातील इतर विकास कामांचीही  ग्रा. पं. सदस्य व पंचायत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य व नागरिकांनी कंग्राळी बुद्रुक गाव बेळगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर आहे. शाहूनगर, यमनापूर, वैभवनगर ही महानगरपालिका हद्दीतील उपनगरे कंग्राळी गावाला लागूनच आहेत. परंतु ग्रा. पं. हद्दीमध्ये येणाऱ्या या गावांकडे शासनाने नेहमी दुर्लक्ष केलेले आहे. केवळ दोन किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना किती अर्ज, विनंत्या कराव्या लागतात, हे या गावचे दुर्दैव आहे. तेव्हा पावसाळ्यानंतर त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करून इतर नागरी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्याकडे करण्यात आली.

प्रारंभी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांचे ग्रामस्थांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहॉ सय्यद, सदस्य जयराम पाटील, उमेश पाटील, यल्लोजी पाटील, अनिल पावशे, बंदेनवाज सय्यद, तानाजी पाटील, दादासाहेब भदरगडे, दत्ता पाटील, विजय पावशे, श्रीकांत लमानी, पीडीओ गोविंद रंगाप्पगोळ, तलाठी दयानंद कुगजी, मेनका कोरडे, अर्चना पठाणेसह ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पावसात पडझड झालेल्या घरांचीही पाहणी

यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची पाहणी करून त्यांना धीर दिला. यावेळी लक्ष्मी फौंडेशनच्यावतीने घर कोसळलेल्या प्रत्येक घरमालकांना आर्थिक मदत करून शासनाकडून अधिकाधिक आर्थिक मदत मंजूर करून देण्याचेही आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article