For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवगोबा यात्रास्थळाची ‘मराठा’च्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

10:41 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवगोबा यात्रास्थळाची ‘मराठा’च्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
Advertisement

शहर देवस्थान कमिटी, परिवहनच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती

Advertisement

बेळगाव : नवगोबा यात्रेसाठी (रेणुकादेवी यात्रा) सोमवारी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल आर. के. रावत व वायव्य परिवहन मंडळाचे बेळगाव विभागीय नियंत्रक राजेश हुद्दार यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आली. नवगोबा यात्रा परिसराचे सुशोभिकरण व इतर सुविधा पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यल्लम्मा येथील यात्रा झाल्यानंतर शिवाजीनगर येथील केएसआरटीसी डेपो येथे मळ्यातली (नवगोबा यात्रा) भरविली जाते. परंतु, मागील काही वर्षात यात्रेसाठी निश्चित जागा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती.

त्यामुळे दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अनिल बेनके व शहर देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेऊन या जागेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर आपण अधिकाऱ्यांना यात्रेच्या ठिकाणी पाठवून देऊ व अहवाल मागवून घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. सोमवारी कर्नल आर. के. रावत यांनी या जागेची पाहणी केली. शहर देवस्थान कमिटीकडून यात्रेची संपूर्ण माहिती घेऊन याचा अहवाल ब्रिगेडियर मुखर्जी यांना सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सचिव परशराम माळी, राहुल जाधव, परिवहन मंडळाचे नारायण तुम्मरगुद्दी, दिनेश एस., ए. व्ही. अंगडी, विभागीय नियंत्रक के. के. लमाणी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.