For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी

10:39 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपा कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी
Advertisement

गोवावेस कार्यालयात चोरी : महसूल निरीक्षकांनीही दिले आयुक्तांना निवेदन

Advertisement

बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न घडला आहे. या घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मंगळवारी सकाळीच त्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली. याचबरोबर या परिसरात येणाऱ्या प्रभागातील महसूल निरीक्षक यांनीही मनपा आयुक्तांना निवेदन  देवून या प्रकरणाचा तपास करावा,अशी मागणी केली. गोवावेस येथील महानगरपालिकेच्या या विभागीय कार्यालयामध्ये दक्षिण भागातील 26 प्रभागांचा कारभार पाहिला जातो. या ठिकाणी घरपट्टी घेणे तसेच इतर कामे केली जातात. मात्र वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत.

महसूल कार्यालय असल्याने यामध्ये रक्कम असल्याचा संशय चोरट्यांना आहे. त्यातूनच या घटना घडत आहेत. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मंगळवारी सकाळी या ठिकाणी भेट दिली. तेथील कार्यालयाची पाहणी करून लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल निरीक्षकांनी मनपा आयुक्तांनाच निवेदन दिले. त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिने पाऊल उचलावे, अशी मागणी केली आहे. बऱ्याचवेळा तेथील कागदपत्रे गहाळ होत आहेत. त्यामुळे त्याचा फटका प्रभागाच्या निरीक्षकांना बसत आहे. तेंव्हा याबाबत गांभीर्याने घ्यावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी यल्लेश बच्चलपुरी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.