महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूर्व भागातील घरांच्या पडझडींची आमदारांकडून पाहणी

11:14 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

यावर्षीच्या पावसाळ्यात दमदार पावसामुळे खानापूर तालुक्याच्या विविध भागातील अनेक गावांतून घरांची पडझड झाली. रविवारी तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावात जाऊन तेथील घरांच्या झालेल्या पडझडीची पाहणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून संबंधित मालकांना शासनातर्फे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले. कसमळगी, मंग्यानकोप, हिडकल आदींसह अन्य गावांतून पडलेल्या घरांची पाहणी आमदारांकडून करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे नेते प्रमोद कोचेरी, भरमाणी पाटील, पूर्वभागातील भाजपाचे कार्यकर्ते व विविध संघ संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article