महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कायदा सेवा प्राधिकार सचिवांकडून आरोग्य केंद्राची पाहणी

11:44 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुतगा येथे दिली धावती भेट : समस्यांचे तातडीने निवारण करण्याच्या सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्या सचिवांनी मुतगा येथील आयुष्मान आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे. तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची चौकशी केली. या आरोग्य सेवा केंद्रातून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबतची संपूर्ण माहिती घेतली. येथील जनतेतून या आरोग्य केंद्राबाबत समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी सांगितले. आयुष्मान योजनेंतर्गत रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र बऱ्याच आरोग्य केंद्राबद्दल तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे त्याची दखल सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी घेतली आहे. मुतगा येथील या केंद्राला त्यांनी भेट दिली.

Advertisement

समस्या सोडविण्याबाबत सूचना

तालुक्यातील विविध आरोग्य केंद्राला व अंगणवाड्यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या आहेत. याचबरोबर जिल्हा न्यायाधीश त्यागराज यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळूर येथील कायदा सेवा प्राधिकारकडे देखील त्यांनी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. काही अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच स्वयंपाक घर लहान असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर संबंधित विभागाला त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्याबाबत सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article