महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

11:03 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनपा स्थायी समिती अध्यक्ष-नगरसेवकांनी केल्या सूचना 

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याची दखल महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षांनी, तसेच काही नगरसेवकांनी घेतली असून गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. रामदेव गल्ली, गणपत गल्ली, शनिवार खूट, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, टिळक चौक या परिसरात पाहणी करण्यात आली.

Advertisement

रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवा, गटारीवरील काँक्रीट व फरशी बसवावी, असे सांगण्यात आले. विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजविणे महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच ही सर्व कामे पूर्ण करावीत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. विद्युतखांबांवरील तारा काही ठिकाणी लोंबकळत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती, नगरसेवक शंकर पाटील, संतोष पेडणेकर यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article