For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जन्म-मृत्यू विभागाची मनपा आयुक्तांकडून पाहणी

11:27 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
जन्म मृत्यू विभागाची मनपा आयुक्तांकडून पाहणी
Advertisement

लवकरच आणखी एक काऊंटर सुरू करणार 

Advertisement

बेळगाव : जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जन्म आणि मृत्यू दाखले देण्यासाठी अधिकवेळ वाढवून दिली आहे. याचबरोबर लवकरच आणखी एका काऊंटरची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली.

सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे जन्म आणि मृत्यू दाखल्यांची नोंद करणे, तसेच दाखला घेताना अनेकांना ताटकळत थांबावे लागत आहे. दररोज याठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत येथील कर्मचारी दाखले देत आहेत. मंगळवारी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी तातडीने त्या विभागाला भेट दिली. तेथील कामकाजाची पाहणी केली. जन्म दाखल्यासाठी 10 रुपये आकारण्यात येत आहेत. त्याबाबतच्या संपूर्ण लेखाजोख्याची आयुक्तांनी तपासणी केली.

Advertisement

महानगरपालिकेकडे जमा झालेली रक्कम दररोज बँकेत जमा करा, अशी सूचना आयुक्तांनी यावेळी दिली. जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी कोणकोणते अर्ज भरले जातात, नोंद कशी केली जाते, नोंद करताना कोणत्या अडचणी येतात का? याची विचारपूस कर्मचाऱ्यांकडे केली. या विभागातील काम पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कामकाज सुरू आहे. जास्तीत जास्त वेळ देण्याबाबत त्यांनीही कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे.

Advertisement
Tags :

.