महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनगोळ चौथे रेल्वेगेट येथे अधिकाऱ्यांकडून पाहणी

11:14 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट परिसरात दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रेल्वेगेटची रुंदी तसेच ये-जा करणारे वाहनचालक या सर्वांची माहिती अधिकारी वर्गाने जाणून घेतली. यावेळी रेल्वेचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते. टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वेगेटप्रमाणेच अनगोळ येथील रेल्वेगेट परिसरात उड्डाणपुलाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. वाहनचालकांची संख्या वाढली असल्याने रेल्वे जाईपर्यंत नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या बाजूला उद्यमबाग व अनगोळ औद्योगिक वसाहत असल्यामुळे दुचाकीसह चारचाकी व अवजड वाहनांचीही ये-जा वाढली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी रेल्वेगेटच्या परिसराची पाहणी केली. या रेल्वेगेटवरून किती वाहनांची ये-जा असते. याचीही माहिती घेतली. त्यामुळे अनगोळ रेल्वेगेटवर उड्डाणपूल होणार का? याची चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत रेल्वे विभागाकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article