कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयएनएस तुशील’ नौदलात समाविष्ट

06:33 AM Dec 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत रशियात जलावतरण :

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

नवीनतम मल्टी-रोल स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्रसज्ज युद्धनौका ‘आयएनएस तुशील’ (एफ 70) सोमवारी रशियातील कॅलिनिनग्राद येथील यंतर शिपयार्ड येथे भारतीय नौदलात दाखल झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या ऐतिहासिक प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आयएनएस तुशील हे भारत आणि रशिया यांच्यातील सखोल आणि मजबूत संबंधांचे आणखी एक प्रतीक म्हणून ओळखले जाईल, असे कार्यक्रमप्रसंगी जाहीर केले.

आयएनएस तुशीलचे जलावतरण भारतीय नौदलाच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे आणि भारत-रशिया संबंध मजबूत करण्याचे प्रतीक म्हणून उदयास आले आहे. रशियातील महत्त्वपूर्ण समारंभाला रशियाचे उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर वासिलीविच फोमिन, कॅलिनिनग्राडचे गव्हर्नर अलेक्सी सर्गेविच बेझप्रोव्हनिख, रशियन नौदलाचे कमांडर-इन-चीफ अॅडमिरल अलेक्झांडर अलेक्सेविच मोइसेव्ह, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार आणि दोन्ही देशांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात ‘आयएनएस तुशील’ कार्यान्वित होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे आणि दीर्घकालीन भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक असल्याचे सांगितले. भारत आणि रशियामधील परस्पर विश्वास आणि सामायिक मूल्यांवर आधारित हे जलावतरण भारतासाठी अभिमानास्पद क्षण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या व्हिजनला रशियाने दिलेला पाठिंबा हे भारत आणि रशिया यांच्यातील सखोल मैत्रीचे आणखी एक उदाहरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत-रशिया संरक्षण सहकार्याची नवी दिशा

राजनाथ सिंह यांनी भारत आणि रशियन नौदलांमधील तांत्रिक सहकार्याच्या वाढत्या सलोख्यावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंध वेगाने प्रगती करत आहेत. त्यांनी हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतानाच जागतिक सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाकडून सहकार्य लाभेल, असेही सांगितले.

आयएनएस तुशील : एक प्रगत युद्धनौका

आयएनएस तुशील ही युद्धनौका ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, स्टिल वर्टिकल लॉन्च सिस्टीम आणि प्रगत पाणबुडीविरोधी शस्त्रांसह प्रगत शस्त्रांनी सुसज्ज आहे. याशिवाय, ते अपग्रेडेड अँटी-सबमरीन आणि एअरबोर्न हेलिकॉप्टर उडवण्यास सक्षम आहे. ही युद्धनौका 30 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने काम करू शकते. त्यात उच्च पातळीवरील ऑटोमेशन आणि स्टेल्थ वैशिष्ट्यो आहेत. या प्रवर्गातील युद्धनौकेच्या निर्मितीसाठी भारतीय नौदल आणि रशिया यांच्याशी ऑक्टोबर 2016 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती.

युद्धनौका बांधणी आणि चाचणी

आयएनएस तुशीलचे बांधकाम 12 जुलै 2013 रोजी सुरू झाले आणि ऑक्टोबर 2021 मध्ये ती कार्यान्वित झाली. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये आपली पहिली समुद्री चाचणी प्रवास सुरू केला आणि सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. आता ही युद्धनौका भारतात पोहोचण्यासाठी सज्ज झाली असून जवळजवळ युद्धसज्ज स्थितीत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article