कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छ. शिवाजी महाराज रस्ता कामाची चौकशी करा

05:34 PM Jul 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

मिरज :

Advertisement

शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची पोलखोल होत आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ता काम करणाऱ्या निर्माण कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराने कामात अनियमितता दाखविल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी तळे तयार झाले आहे. या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या निर्माण कन्स्ट्रक्शनची चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पादचारी (फुटपाथ) मार्गाचा समावेश आहे. रस्ताशेजारील अतिक्रमणे हटविण्याचा तसेच रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मिळकतधारकांना १० कोटी, ६५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा विषय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासन यांच्यात जबाबदारी निश्चितीवरून प्रलंबित आहे.

रस्ता कामाचा ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शनने रस्ता करताना कोणत्याही नियमांचे पालन न केल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी उबकी तयार झाली आहेत.

पाण्याचा निचऱ्याचे कोणतेच नियोजन नसल्याने रस्ता लवकर खराब लवकर होणार आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्ता कामात अनियमितता दाखविणाऱ्या निर्माण कन्स्ट्रक्शनवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article