महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्चना घारे- परबांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन

04:58 PM Nov 30, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडीत उद्या अर्चना फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

Advertisement

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे.अर्चना फाऊंडेशनच्या वतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.प्रदर्शनाचे उद्घाटन १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. तरूण भारत, सिंधुदुर्ग - रत्नागिरी आवृत्तीचे संपादक, श्री. शेखरजी सामंत यांच्या शुभ हस्ते आणि माजी राज्यमंत्री श्री. प्रविणभाई भोसले, सकाळ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, श्री. शिवप्रसाद देसाई, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत, साहित्यिक प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, कवयित्री डॉ. शरयू आसोलकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, प्रसिद्ध मालवणी कवी श्री. दादा मडकईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Advertisement

श्री देव नारायण मंदिर हॉल, मोती तलाव समोर, मेन रोड, सावंतवाडी येथे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनचा लाभ घेता येणार आहे. सर्वांनी आपल्या मित्र परिवार, कुटुंबासह या प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांच्या दुनियेची सफर करावी आणि ज्ञानाची शिदोरी सोबत न्यावी असे आवाहन अर्चना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
# archna ghare parab # sawantwadi # tarun bharat news# sindhudurg#
Next Article