For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकचालकाच्या चुकीमुळे निष्पाप तरुणाचा बळी

06:55 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रकचालकाच्या चुकीमुळे निष्पाप तरुणाचा बळी
Advertisement

बॅरिकेड्स चुकविण्यासाठी राँग साईडने दामटला ट्रक

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बॅरिकेड्स चुकविण्यासाठी चुकीच्या दिशेने ट्रक चालवून मोटरसायकलला ठोकरल्याने मारुतीनगर येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास किल्ल्याजवळील अशोक स्तंभानजीक ही घटना घडली आहे. ट्रकचालकाविरुद्ध वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

श्रीकांत सुरेश हंपण्णावर (वय 32) रा. मारुतीनगर, बेळगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आपल्या मोटरसायकलवरून तो शहरात येत होता. अशोक स्तंभाकडून गांधीनगरकडे जाताना पुढे असलेले बॅरिकेड्स चुकविण्यासाठी गांधीनगरला जाणाऱ्या ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने ट्रक घातल्याने हा अपघात झाला.

ट्रकची दुचाकीला धडक बसताच श्रीकांत गंभीर जखमी झाला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. ट्रकचालक खादर पटेल, रा. वाडी, जि. गुलबर्गा याच्याविरुद्ध वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

श्रीकांतच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. तो शिंदोळीत केशकर्तनाचे दुकान चालवित होता. ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने ट्रक घातल्याने हा अपघात झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.