महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणात आयएनएलडी प्रदेशाध्यक्षांची हत्या

06:14 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बंदुकधाऱ्यांनी मानेवर दोन गोळ्या झाडल्या, एका सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ बहादूरगड

Advertisement

हरियाणातील बहादूरगडमध्ये आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नफे सिंग राठी यांची रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. वाहनातून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात नफे सिंग राठी यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही अनेक गोळ्या लागल्या आहेत. या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथके पाठविण्यात आली असून तपासनाकेही सतर्क करण्यात आले आहेत.

बहादूरगडमधील संखोल बाराही रोडवरील रेल्वे गेटजवळ बंदुकधाऱ्यांनी राठी यांच्या वाहनताफ्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात नफे सिंग राठी यांच्या मानेवर दोन गोळ्या लागल्या. याशिवाय त्यांच्या कमरेलाही गोळ्या लागल्या होत्या. हल्लेखोर आय-10 वाहनातून आले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या इतरांना गंभीर अवस्थेत ब्रह्मशक्ती संजीवनी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बंदुकधाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हल्लेखोर कुठून आले आणि कुठे गेले याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात पोलीस सध्या व्यस्त आहेत. घटनास्थळी 18 गोळ्यांचे नमुने सापडले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article