मतदानापूर्वी बोटाला शाई ; प्रकरणात तथ्य नाही
कोल्हापूर :
शहरातील मध्यवर्ती भागात मंगळवारी रात्री एका विशिष्ठ समाजातील लोकांनी बुधवारी मतदानाला येवून नये. याकरीता त्यांना पैश्याचे आमिष दाखवून, त्यांच्या बोटाला मंगळवारी रात्रीच शाई लावून, मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या उमेदवार प्रतिनिधी दशरथ कांबळे यांनी केला.
याबाबतचा तक्रारी अर्ज जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून, चौकशी केली असता त्यामध्ये कोणतेही तथ नसल्याचे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.
निवडणूकामधील गैरप्रकारामध्ये मतदारांना आर्थिक आमिष दाखविण्याचा प्रकार अलिकडच्या काळात सर्रासपणे घडू लागला आहे. मतदारांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून हवे तसे मतदान कऊन घेण्याच्या घटना घडत असताना, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या उमेदवार प्रतिनिधी दशरथ कांबळे यांनी मात्र शहरातील मध्यवर्ती भागातील एका विशिष्ठ समाजातील लोकांनी बुधवारी मतदानाला येवून नये. याकरीता त्यांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या बोटाला मंगळवारी रात्रीच शाई लावून, त्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप कऊन, त्याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी दाखल केली होती. त्याविषयाच्या बातम्या आणि व्हिडीओ समाजमाध्यमात झळकल्या होत्या. जुना राजवाडा पोलिसांनी या तक्रारीचा गांभीर्याने दखल घेवून चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये कोणतेही तथ आढळून आलेले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक झाडे यांनी दिली.