For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोकुळ’चा कर्नाटक दूध उत्पादकांवर अन्याय

10:01 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘गोकुळ’चा कर्नाटक दूध उत्पादकांवर अन्याय
Advertisement

वार्ताहर /दड्डी

Advertisement

कर्नाटकच्या सीमाभागातून कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाला मोठ्या प्रमाणात म्हैस व गाईच्या दुधाचा पुरवठा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून दूध पुरवठा करण्यात कर्नाटकातील दूध उत्पादकांनी गोकुळच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला आहे. असे असताना गोकुळ दूध संघाने कर्नाटकातील दूध उत्पादकांवर अन्याय केला आहे. सदर अन्याय थांबला नाहीतर येत्या काळात उत्पादकांच्यावतीने योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी नाराजी दड्डी विभागातील दूध उत्पादकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. दूध उत्पादन हा व्यवसाय प्रमुख व्यवसायाच्या प्रवाहात सक्रिय होत आहे. या व्यवसायावर कुटुंबांचा चरितार्थ अवलंबून आहे. दूध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. महिलांची या व्यवसायातून प्रगती साधली जात असतानाच गोकुळकडून प्रोत्साहनही दिले जाते. पण ऐनवेळी दूध उत्पादनाविऊद्ध निर्णय घेऊन संघाने उत्पादकांचे खच्चीकरण केले आहे. कर्नाटकातील उत्पादकांविषयी दुटप्पी भूमिका दूध संघाने घेतली आहे. त्यामुळे उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.