कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जातीगणगेत अन्याय : विजापुरात गाणिग समाजाचा निषेध मोर्चा

11:47 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/विजापूर 

Advertisement

जयप्रकाश हेगडे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या जातीगणनेच्या अहवालात गाणिग समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी दाखवली गेल्यामुळे बहुसंख्य गाणिग समाजावर मोठा अन्याय झाला आहे, असा संताप गाणिग समाजाकडून व्यक्त केला असून राज्य सरकारने हा अहवाल तात्काळ फेटाळावा, अशी मागणी केली आहे. विजापूर येथील वनश्री मंगल कार्यालयात झालेल्या निषेध सभेत समाजाचे विविध नेते, संघटनांचे पदाधिकारी व हजारो समाजबांधवांनी एकत्र येऊन आपला संताप व्यक्त केला.

Advertisement

विजापूर जिल्हा गाणिग समाज संघ, जिल्हा युवा गाणिग संघ, गाणिग कर्मचारी कल्याण संघ, निवृत्त गाणिग समाजाचे कर्मचारी यांच्यासह अनेक नेत्यांनी या निर्णयाविरुद्ध एकमुखी भूमिका घेतली. त्यानंतर निषेध रॅली काढण्यात आली. जी शहरातील प्रमुख रस्त्यांमधून मार्गक्रमण करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी चळकापूर आरूढाश्रमाचे शंकरनंद स्वामीजी, गाणिग समाजाचे नेते दयासागर पाटील, अखिल भारतीय गाणिग संघाचे राज्याध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष बी. बी. पासोदी, सरचिटणीस डॉ. बाबू सज्जन, महिला अध्यक्ष मीनाक्षी उटगी, युवा संघाचे अध्यक्ष गुरुनाथ अन्देवाडी यांच्यासह हजारो समाजबांधव निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article