जखमी मॅक्सवेल न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर
वृत्तसंस्था / मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल मंगळवारी माऊंट मौंगानुई येथे नेटमध्ये गोलंदाजी करताना मिशेल ओवेनने मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्हने जखमी झाला त्यामुळे न्यूझ्^ााrलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून तो बाहेर पडला आहे.
सिडनी सिक्सर्स आणि न्यू साऊथ वेल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिपला बुधवारपासून माऊंट मौंगानुईच्या बे ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी मॅक्सवेलच्या जागी बोलावण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा धक्का आहे. ज्यांनी मालिकेच्या तयारीत जोश इंग्लिसलाही पायाच्या दुखापतीमुळे गमावले आहे. ज्यामुळे अॅलेक्स कॅरीची निवड झाली आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका ऑस्ट्रेलियाला जिंकून देताना नाबाद अर्धशतक झळकवले होते. नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. मॅक्सवेल येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियात परतेल आणि एका तज्ञांची मदत घेईल. त्याच्या जागी येणारा फिलिपने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आणि अलिकडच्या ऑस्ट्रेलिया अ भारत दौऱ्यातही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाकडे आधीच कॅमेरॉन ग्रीन नाही, ज्याने आगामी अॅशेसच्या तयारीला प्राधान्य दिले आहे आणि तो मायदेशातील शेफील्ड शिल्ड खेळणार आहे. आघाडीचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स देखील सध्या त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नाही तर नॅथन एलिस त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी न्यूझीलंड मालिकेला मुकला आहे.