For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराचे प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी नगरसेवक मंडोळकरांचा पुढाकार

10:54 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहराचे प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी नगरसेवक मंडोळकरांचा पुढाकार
Advertisement

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरील हरिकाका कंपाऊंडपासून लेंडीनाल्यापर्यंत शहरातील कचरा फेकून दिला जातो. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी तातडीने त्याठिकाणी जेसीबी घेऊन स्वच्छतेचे काम हाती घेतले. याबद्दल या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शहराच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढीग जमत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा फेकून दिला जातो. परिणामी शेतकऱ्यांना तसेच येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे पाण्याला पुढे जाण्यासाठी वाटच नसल्यामुळे पाणी साचून रहात आहे. शिवारातील पिके पूर्णपणे कुजून जात आहेत. तेव्हा तातडीने येथील कचरा हटवावा आणि पाण्याला मार्ग मोकळा करुन द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Advertisement

सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन 

नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी जेसीबी घेऊनच त्याठिकाणी हजर झाले. त्यानंतर कचरा बाजूला काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी चर मारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाचा एक बॉक्सदेखील जेसीबीच्या साहाय्याने खुला करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकून देत आहेत. तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅमेरे, पथदीप बसवावेत अशी मागणी यावेळी केली. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करू, सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. यावेळी नारायण सावंत, खाचू बेळगुंदकर, बाळू पाटील, पारीस जनगौडा, गॅरेज मालक भाऊ मोदगेकर, वसंत पाटील, कृष्णा पाटील, भावकाण्णा पाटील, लक्ष्मण भोमणाचे, किरण मोदगेकर यांच्यासह इतर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.