महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिक्षक बदली कौन्सिलिंगला प्रारंभ

11:19 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिक्षक बदली कौन्सिलिंगला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी थोड्या वेळाने कौन्सिलिंग सुरू झाले. बेंगळूरमधून लिंक उशिरा देण्यात आल्याने काहीसा वेळ लागला. परंतु त्यानंतर सुरळीतपणे कौन्सिलिंगची प्रक्रिया राबविण्यात आली. महिला विद्यालयाच्या सभागृहामध्ये कौन्सिलिंग घेण्यात आले. यामुळे सकाळपासूनच शिक्षकांची कॉलेज रोड परिसरात गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी चित्रकला शिक्षक, मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण शिक्षक व सहशिक्षकांचे कौन्सिलिंग घेण्यात आले. पहिल्या दिवशी एकूण 300 शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण करण्यात आले. 30 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Advertisement

कौन्सिलिंगच्या ठिकाणात अचानक बदल

Advertisement

क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात कौन्सिलिंग घेतले जाते. परंतु यावेळी कार्यालयात गळती सुरू असल्याने बी. के. मॉडेल शाळेमध्ये कौन्सिलिंग निश्चित केले. परंतु पावसाच्या संततधारेमुळे मंगळवारी रात्री कौन्सिलिंगच्या ठिकाणात अचानक बदल करण्यात आला. महिला विद्यालयमध्ये कौन्सिलिंग सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article