For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ

10:19 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ
Advertisement

4 ते 8 वयोगटातील वासरांना लस : घरोघरी मोहीम

Advertisement

बेळगाव : ब्रुसेलोसिस या धोकादायक संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारपासून जिल्ह्यात या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. 4 ते 8 महिन्यांच्या मादी जातीच्या वासरु आणि रेडकांना लस टोचली जात आहे. पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पशुसंगोपन खात्याने केले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात 20 हजार 500 वासरांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. घरोघरी जाऊन पशुवैद्यकीय अधिकारी लस टोचत आहेत. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये लहान वासरांची संख्याही अधिक आहे. यापैकी केवळ 4 ते 8 महिन्यांच्या वासरांनाच ही लस दिली जाते. ब्रुसेलोसिस हा भयानक रोग असून त्याची लागण झाल्यास गर्भपात होतो. विशेषत: लागण जनावरांच्या संपर्कात आल्यास मानवालाही त्याचा धोका उद्भवतो. यासाठी खबरदारी म्हणून खात्याने सर्वत्र मोहीम गतिमान केली आहे. अलिकडे जनावरांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. मागील वर्षी लम्पीमुळे पशुपालकांना मोठा फटका बसला होता. पुन्हा जनावरांना कोणत्याही रोगाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून वेळोवेळी प्रतिबंधक मोहीम हाती घेतली जात आहे.

20 हजार वासरांना दिली लस

Advertisement

जिल्ह्यात 34 हजार 150 वासरे आणि रेडकांची संख्या आहे. यापैकी 20 हजार वासरांना लस टोचली जाणार आहे. विशेषत: जनावरांच्या गोठ्यापर्यंत जाऊन ही मोहीम राबविली जात आहे. ब्रुसेलोसिसचा धोका लक्षात घेऊन सर्व पशुपालकांनी आपल्या वासरांना लस टोचून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.