For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महागाईने गाठला चार महिन्यातील उच्चांक

06:36 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
महागाईने गाठला चार महिन्यातील उच्चांक
Advertisement

जूनमध्ये किरकोळ महागाई दर 5.08 टक्क्मयांवर 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

किरकोळ चलनवाढीचा दर जूनमध्ये 5.08 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवार, 12 जुलै रोजी ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या चार महिन्यांतील हा महागाईचा उच्चांक आहे. एप्रिलमध्ये महागाई 4.85 टक्के होती. तर एक महिन्यापूर्वी मे महिन्यात महागाई दर 4.75 टक्के इतका नोंद झाला होता.

Advertisement

गेल्या महिन्याभरात खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने महागाई वाढली आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.69 वरून 9.36 टक्के झाला आहे. त्याचवेळी, शहरी महागाई देखील 4.21 टक्क्यांवरून 4.39 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ग्रामीण चलनवाढीचा दरही 5.34 टक्क्मयांवरून 5.66 टक्क्मयांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थ आणि विशेषत: फळे आणि भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई पुन्हा एकदा 5.14 टक्क्मयांपर्यंत वाढू शकते. असे झाल्यास डिसेंबर 2023 नंतरचा हा पाच महिन्यांचा उच्चांक असेल. एप्रिलमध्ये तो 4.83 टक्क्मयांच्या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या मते, देशातील अनेक भागांमध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम भाजीपाला आणि फळांच्या किमतीवर झाला आहे. फळे आणि भाज्यांच्या महागाई दरात सुमारे दोन टक्क्मयांनी वाढ झाली आहे.  फळांची महागाई एप्रिलमधील 3.5 टक्क्मयांवरून मे महिन्यात 5.5 टक्क्मयांपर्यंत वाढली आहे. गेल्या महिन्यात फळांच्या किमतीत 2.5 टक्क्मयांनी वाढ झाली.  तसेच भाजीपाल्याच्या दरातही मासिक आधारावर 5.2 टक्क्मयांनी वाढ झाली. कांदे, बटाटे, फ्लॉवर आणि कोबीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम एकूण महागाईवर दिसून येतो.

Advertisement
Tags :

.