‘इन्फिनिक्स झीरो 40’ स्मार्टफोन लाँच
सुरुवातीची किंमत 27,999 रुपये : एआयसह 12 जीबी रॅम
मुंबई :
चीनी टेक कंपनी इन्फिनिक्सने बुधवारी आपला ‘इन्फिनिक्स झीरो 40’ हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच एचडीसह अमोलेड वक्रचा डिस्प्ले, 108मेगापिक्सल मुख्य कॅमेरा व 50 एमपी प्रंट कॅमेरा राहणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड14 वर आधारीत आहे. तसेच मीडिया टेक डायमेन्शन8200 चिपसेटद्वारे आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी आणि 512 जीबी इतक्या स्टोरेजचा पर्याय दिला आहे. सदरच्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ही 27,999 रुपये राहणार आहे. तसेच याच्यावरील मॉडेल हे 30,999 रुपये इतके राहणार असल्याची माहिती आहे. 21 सप्टेंबरपासून ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरुन सदरचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनला 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून आर्टिफिशय इंटेलिजन्सची सुविधा यात आहे. वायोलेट गार्डन, मुव्हींग टीटॅनियम व रॉक ब्लॅक या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.