माणूस चावल्याने झाले इंफेक्शन
चोराने घेतला दुकानदाराचा चावा
माणसांनी चावल्यास लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुर्कियेतून समोर आलेल्या घटनेने सर्वांना हैराण केले आहे. येथे एका चोराने पळून जाण्यादरम्यान दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला. प्रारंभी ही किरकोळ जखम वाटली, परंतु काही महिन्यांमध्ये हीच जखम एक धोकादायक इंफेक्शनमध्ये बदलली आणि ती प्राण्याच्या दंशाहून अधिक घातक ठरली आहे.
इस्तंबुल येथे 60 वर्षीय दुकानदाराला दोन चोरांनी लूट करताना लक्ष्य केले. झटापटीत एका चोराने दुकानदाराच्या हातावर अत्यंत जोराने चावा घेतल्याने खोल जखम झाली. स्थानिक क्लीनिकमध्ये याला किरकोळ जखम मानत प्रथमोपचार करण्यात आले आणि दुकानदाराला घरी पाठविण्यात आले.
परंतु तीन महिन्यांनी स्थिती बिघडू लागली. दुकानदाराला तीव्र ताप, थंडी आणि हातात असामान्य सूज येऊ लागली. तो रुग्णालयात पोहाचल्यावर जखम गंभीर बॅक्टेरियल इंफेक्शनमध्ये बदलल्याचे डॉक्टरांना आढळून आले त्याचा हात अत्यंत सुजल्याने रंगच बदलला होता, हात कापावा लागू शकतो अशी भीती डॉक्टरांना होती.
कसा वाचविला हात?
डॉक्टरांनी अनेक प्रकारचे उपचार केले तरीही इंफेक्शनवर लवकर नियंत्रण मिळविता आले नाही. अखेर त्यांनी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीची मदत घेतली. या खास उपचारात रुग्णाला दबाबयुक्त खोलीत शुद्ध ऑक्सिजन देण्यात येतो, ज्यामुळे इंफेक्शनशी लढणे आणि घाव भरण्यास मदत मिळते. तीन महिन्यांच्या फिजियोथेरपीनंतर हा उपचार अखेर दुकानदाराचा हात वाचविण्यास यशस्वी ठरला.
डॉक्टरांचा इशारा
हे प्रकरण नंतर एका वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आणि तुर्किये प्रसारमाध्यमांध्ये चर्चेत राहिले. माणसाने चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, माणसाने चावल्यास बॅक्टेरिया थेट रक्तात पोहोचू शकतात. जे धोकादायक इंफेक्शनचे कारण ठरू शकते असे डॉक्टरांनी म्हटले आहे.