महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

06:15 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जकार्ता

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून बॅडमिंटनपटूंना ही स्पर्धा सरावाच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाची राहिल. भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे दुहेरीचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Advertisement

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची टॉप सिडेड जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जाते. 2024 च्या बॅडमिंटन हंगामात सात्विक आणि चिराग यांच्या कामगिरीत सातत्य दिसत असून त्यांनी फ्रेंच खुली सुपर 750 आणि थायलंड खुली सुपर 500 स्पर्धा जिंकल्या आहेत. तर एकूण चार स्पर्धांमध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. सात्विक आणि चिराग या जोडीला इंडोनेशिया आणि चीनच्या स्पर्धकांकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. थॉमस चषक स्पर्धेत तसेच अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यात झालेल्या सिंगापूर खुल्या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांचे आव्हान लवकरच समाप्त झाले होते. गेल्या वर्षी सात्विक आणि चिराग या जोडीने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 1000 दर्जाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून नवा इतिहास घडविला. इंडोनेशियन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांचा सलामीचा सामना मलेशियाच्या चाँग आणि केई ती यांच्या बरोबर होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला आता दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून या कालावधीत विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आणखी दोन स्पर्धा होणार असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियन खुली आणि कॅनडा खुल्या स्पर्धांचा समावेश आहे.

महिलांच्या विभागात भारताच्या पीव्ही सिंधूला दर्जेदार कामगिरीसाठी अधिक झगडावे लागेल. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी तिला स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. अलिकडेच तिने मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविल्याने तिचा आत्मविश्वास थोडा बळावला आहे. इंडोनेशियन स्पर्धेमध्ये अॅन सियंग, चेन युई फेई, यामागुची आणि कॅरोलीना मॅरिन यांचा सहभाग राहिल. सिंधूचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या वेन हेसू बरोबर होणार आहे. पुरुष विभागात एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. फ्रेंच आणि अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती. त्याचा इंडोनेशियन स्पर्धेतील सलामीचा सामना जपानच्या तेसुनेमाशी होणार आहे. एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना भारताच्या राजवत बरोबर होईल. किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज यांचा या स्पर्धेत सहभाग आहे. तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा या भारतीय जोडीने यापूर्वीच पॅरिस ऑलिम्पिकचे आपले तिकीट निश्चित केले आहे. त्यांचा सलामीचा सामना कॅनडाच्या डेंट आणि क्रिस्टल लेईशी होईल. त्रिचा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या चेंग पेई व हेसिंग बरोबर होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article