For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिगो’ जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी

07:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिगो’ जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी
Advertisement

कंपनीचे बाजारमूल्य 1.47 लाख कोटींच्या घरात : साउथवेस्ट एअरलाईनला टाकले मागे

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारताची इंडिगो एअरलाइन बाजारमूल्याच्या बाबतीत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी बनली आहे. कंपनीचे बाजारमूल्य 17.6 बिलियन डॉलर (सुमारे 1.47 लाख कोटी) पर्यंत पोहोचले आहे. साउथवेस्ट एअरलाइन्सला मागे टाकत इंडिगोने हे स्थान मिळवले आहे. जागतिक विमान कंपन्यांच्या या यादीत अमेरिकास्थित डेल्टा एअरलाइन्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचे मार्केट कॅप 30.4 अब्ज डॉलर (सुमारे 2.53 लाख कोटी) आहे. रायनायर होल्डिंग्ज 26.5 अब्ज डॉलर (2.16 लाख कोटी) बाजारमूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

गेल्या वर्षी 14 व्या क्रमांकावर

गेल्या वर्षी मार्चमध्ये, इंडिगो बाजारमूल्याच्याबाबतीत जागतिक एअरलाइन्सच्या यादीत 14 व्या क्रमांकावर होती. इंडिगोने डिसेंबर 2023 मध्ये युनायटेड एअरलाइन्सला मागे टाकले होते आणि या वर्षी जानेवारीमध्ये एअर चायना आणि फेब्रुवारीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सला मागे टाकले होते.

समभागांमध्ये 6 महिन्यात 50 टक्केपेक्षा अधिकची वाढ

कंपनीच्या समभागामध्ये 6 महिन्यात 50 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या समभागांनी 102.55 टक्के परतावा दिला आहे. त्यात गेल्या  6 महिन्यात 50.25 टक्के, एका महिन्यात 18.25 टक्के आणि यावर्षी 1 जानेवारीपासून 27.78 टक्के वाढ झाली आहे. इंडिगो म्हणजेच इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स 10 एप्रिल रोजी 4.73 टक्के वाढले आणि 3,806 रुपयांवर बंद झाले.

भारतीय विमान वाहतूक बाजारात 60 टक्के वाटा

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगोचा वाटा 60.2 टक्के आहे. प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत एअर इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे, तिचा वाटा 12.2 टक्के आहे. तथापि, टाटा समूहाच्या अंतर्गत चालणाऱ्या विमान कंपन्यांचा एकूण वाटा 28.2टक्के आहे.

Advertisement
Tags :

.