महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इंडिगो’मधून नोव्हेंबरमध्ये 1 कोटी प्रवाशांचा प्रवास

06:58 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय देशांतर्गत विमान वाहतुकीच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक वाहतूक झाली आहे. या वाढीचा विमानतळ आणि विमानसेवा या दोन्हींवर परिणाम झाला. दिल्ली विमानतळाने आतापर्यंतचा सर्वोत्तम महिना नोंदवला. याशिवाय, एका अहवालानुसार, तीन विमान कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे, अशी माहिती भारताचे हवाई वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) यांनी दिली आहे.

Advertisement

इंडिगो 1 कोटी प्रवाशांना सेवा देणारी कंपनी

एका महिन्यात 10 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 1 कोटीहून अधिक प्रवाशांना सुविधा देणारी इंडिगो ही भारतातील पहिली एअरलाइन बनली आहे. यापैकी 9.07 दशलक्ष म्हणजेच 90.7 लाख देशांतर्गत प्रवासी होते, तर उर्वरित आंतरराष्ट्रीय प्रवासी होते.

18 वर्षांपूर्वी इंडिगोची स्थापना झाल्यापासून ही एअरलाइनची सर्वाधिक देशांतर्गत प्रवासी संख्या आहे. एअरलाइनने ऑक्टोबर 2024 मध्ये 8.64 दशलक्ष प्रवासी आणि डिसेंबर 2023 मध्ये 8.52 दशलक्ष प्रवाशांचे मागील रेकॉर्ड मागे टाकले. डिसेंबर 2024 मध्ये, एअरलाइन आणखी एक विक्रम प्रस्थापित करू शकते.

 बाजारात 63 टक्के हिस्सेदारी

इंडिगोचा बाजारहिस्सा नोव्हेंबरमध्ये 63.6 टक्केच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. त्याचवेळी, एअर इंडियाने नोव्हेंबरमध्ये 3.47 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, ज्यात तिच्या उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचा समावेश आहे.

नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाची बाजारातील हिस्सेदारी 27.3 टक्के होती. नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाची बाजारातील हिस्सेदारी 27.3 टक्के होती. विमान कंपनी अलीकडेच विस्तारामध्ये विलीन झाली आहे. एअर इंडियाने पहिल्यांदाच एका महिन्यात तीस लाखांहून अधिक देशांतर्गत प्रवाशांची सोय केली आहे.  मुंबई-आधारित अकासा एअरने नोव्हेंबर 2024 मध्ये 6,74,000 देशांतर्गत प्रवाशांना सेवा दिली, ज्यामुळे एअरलाईनचा बाजार हिस्सेदारी 4.7 टक्केपर्यंत वाढली.

डिसेंबरमध्ये विक्रमी संख्या

2024 मध्ये, भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्राने आधीच 2023 ची रहदारी पातळी ओलांडली आहे. डिसेंबर 2024 हा आणखी एक विक्रमी महिना ठरत आहे, ज्यामध्ये नोव्हेंबरच्या तुलनेत प्रवासी वाहतूक 3 टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article