महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिगो एअरलाईन्सला सर्व्हर डाऊनचा फटका

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशभरातील विमानतळांवर प्रवाशांच्या लांबलचक रांगा : बुकिंगसोबतच चेक इन करण्यात समस्या

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

इंडिगो एअरलाईन्सची ऑनलाईन प्रवासी सेवा प्रणाली ‘डाऊन’ झाल्यामुळे शनिवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या समस्येमुळे लोक ऑनलाईन विमान तिकीट बुक करू शकत नव्हते. तसेच चेक-इन करण्यातही अनेक समस्या येत होत्या. विमानतळांवरील विमानसेवा आणि ग्राउंड सेवेवरही परिणाम दिसून आल्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या समस्येबाबत विमान कंपनीकडून निवेदन जारी करण्यात आले. मात्र प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने तासन्तास विमानतळांवर ताटकळत उभे रहावे  लागले.

इंडिगो एअरलाईनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्टद्वारे सर्व्हर डाऊनसंबंधी माहिती दिली. ‘आमची टीम या समस्येवर काम करत असून लवकरच परिस्थिती सामान्य होईल.’ असे इंडिगोने स्पष्ट केले होते. याआधी तीन महिन्यांपूर्वी अमेरिकन अँटी-व्हायरस कंपनी क्राउडस्ट्राईकच्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे लाखो संगणक ठप्प झाल्यामुळे जगभरातील विमानतळ, उ•ाणे, रेल्वे, ऊग्णालये, बँका, रेस्टॉरंट, डिजिटल पेमेंट, स्टॉक एक्स्चेंज, टीव्ही चॅनेल आणि सुपरमार्केट यासारख्या अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम दिसून आला होता. याचा सर्वाधिक परिणाम विमानतळावर दिसून आल्यानंतर जगभरातील 3 टक्के म्हणजे सुमारे 4,295 उ•ाणे रद्द करावी लागली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article