रेपो दर जैसे थे राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सदस्यांच्या पतधोरण समितीची बैठक 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार असून यामध्ये रेपो दरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या जूनमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रेपोदरामध्ये 50 बेसिस पॉईंटस्ची कपात करण्यात आली होती त्यानंतर सलगच्या दोन बैठकांमध्ये रेपो दर जैसे थे ठेवण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच दुसऱ्या तिमाहीचे जीडीपी आकडे जाहीर झाले असून 8.2 टक्के इतका जीडीपी दर भारताने साध्य केला आहे. काही दिवसापूर्वीपर्यंत तर पाव टक्का रेपो दरामध्ये कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. स्टेट बँकेने आता आपल्या निर्णयामध्ये बदल केला असून रेपोदर जैसे थे राहणार असल्याचे म्हटले आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मुख्य अर्थतज्ञ गौरासेन गुप्ता यांनी देखील रेपोदरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे म्हटले आहे.