भारताचा युवा क्रिकेट संघ जाहीर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील युवा क्रिकेट संघाबरोबर होणाऱ्या आगामी मालिकांसाठी शनिवारी भारतीय युवा क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. उभय संघामध्ये तीन वनडे आणि दोन चार दिवसांचे सामने खेळविले जाणार आहेत.
21, 23, 26 सप्टेंबर रोजी हे तीन वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान चार दिवसांचे दोन सामने खेळविले जातील. वनडे सामने पुडुचेरी तर चार दिवसांचे सामने चेन्नईत होतील. वनडे मालिकेसाठी भारतीय युवा संघाच्या कर्णधारपदी उत्तरप्रदेशच्या मोहम्मद अमानची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय युवा संघ वनडे मालिकेसाठी-रुद्र पटेल, साहील पारेख, के.पी. कार्तिकेय, मोहम्मद अमान (कर्णधार), किरण चोरमाले, ए. कुंडू, हरिवंश सिंग पांगलिया, समित द्रवीड, युधाजित गुहा, एन. समर्थ, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजवत, मोहम्मद इनान,
चार दिवसांच्या सामन्यासाठी संघ: वैभव सुर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मलहोत्रा, सोहम पटवर्धन, के.पी.कार्तिकेय, समित द्रवीड, ए. पुंडू, हरिवंश सिंग पांगलिया, चेतन शर्मा, एन. समर्थ, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजित सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद इनान