For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांपुढे आज इंग्लंडंचे आव्हान

06:55 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांपुढे आज इंग्लंडंचे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ इंदूर

Advertisement

सलग दोन पराभवांनंतर संघाचे आव्हान पुनऊज्जीवित करण्याच्या दबावाखाली असलेल्या भारताला आज रविवारी येथे होणाऱ्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या लढतीत इंग्लंडचा सामना करताना आपल्या माऱ्यात संतुलन आणण्यासाठी सहाव्या गोलंदाजाला संधी देण्याचा विचार करावा लागेल.

विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविऊद्ध सलग तीन गड्यांनी पराभव झाल्यानंतर भारताच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे त्यांच्या रणनीतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. पाच फलंदाज, एक यष्टीरक्षक आणि पाच गोलंदाज, त्यापैकी तीन अष्टपैलू खेळाडू हे या विश्वचषक स्पर्धेत भारताचे विश्वासार्ह मॉडेल राहिले आहे. परंतु त्याच्या मर्यादा उघड झाल्या आहेत, ज्यामुळे संघाला आता विजय अत्यावश्यक असलेल्या परिस्थितीत आपल्या रणनीतीमध्ये बदल घडवून आणावा लागेल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन त्यांनी जिंकणे गरजेचे आहे.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेविऊद्ध पाच गोलंदाज वापरण्याचा दृष्टिकोन उपयोगी नसल्याचे दिसून आले, तरीही ऑस्ट्रेलियाविऊद्ध व्यवस्थापनाने ती रचना कायम ठेवली, ज्यामुळे आणखी एक पराभव झाला. यामुळे भारताला विविधता आणि धार नसलेला मारा आघाडीच्या संघांविऊद्ध वापरणे परवडणारे नाही याचा ठोस पुरावा मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे 251 आणि 330 धावांचा पाठलाग करत असताना भारताला एखाद्या तज्ञ गोलंदाजाची अनुपस्थिती महागात पडली, ज्यामुळे भारताकडे दबाव आणण्याची क्षमता नसल्याचे दिसून आले.

अनेक अष्टपैलू खेळाडू समाविष्ट करून फलंदाजीची खोली वाढविण्याच्या रणनीतीचे असलेल्या आकर्षणामुळे भारत अमनजोत कौरला खेळविणे पसंत करत आहे आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंहसारख्या बळी मिळवू शकणाऱ्या गोलंदाजाला बाहेर बसवत आहे. रेणुकाच्या अनुपस्थितीमुळे मारा थोडा एकसुरी झाला आहे आणि तिच्या समावेशामुळे आवश्यक असलेली विविधता येऊ शकते. तसेच आतापर्यंत जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळलेल्या तऊण वेगवान गोलंदाज क्रांती गौडवरील दबाव त्यामुळे कमी होऊ शकतो. त्यांच्याकडे डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव किंवा वेगवान गोलंदाज अऊंधती रे•ाr यांना खेळविण्याचा पर्याय देखील आहे.

परंतु भारतासाठी तितकीच चिंताजनक बाब म्हणजे त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाजांचा फॉर्म कमी होत आहे. भारताने त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांचा उत्कृष्ट फॉर्म घेऊन विश्वचषकात प्रवेश केला होता. परंतु त्यांची गती कमी झाल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्ध सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी वेगवान अर्धशतके झळकावत आपल्या चमकदार कामगिरीची झलक दाखवली, पण कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या नेतृत्वाखालील मधल्या फळीला अर्थपूर्ण योगदान देण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारताने त्यांच्या सलामीवीरांनी दिलेली चांगली सुऊवात वाया घालवली आणि फक्त 36 धावांत सहा गडी गमावल्याने एका षटकापेक्षा जास्त वेळ शिल्लक असताना भारताचा डाव संपुष्टात आला.

अशाच प्रकाराने श्रीलंका आणि पाकिस्तानविऊद्ध त्यांना गंभीर अडचणीत आणले होते, परंतु अष्टपैलू खेळाडूंनी त्यांना बाहेर काढले. मात्र चार वेळच्या विजेत्या इंग्लंडचा सामना करताना भारताच्या मुख्य फलंदाजांना प्रभावी कामगिरी करावी लागेल. येथील होळकर स्टेडियमवरील परिस्थिती पारंपरिकपणे फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. आतापर्यंत या ठिकाणी खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांत भरपूर धावसंख्या पाहायला मिळालेली आहे. दुसरीकडे, इंग्लंड स्पर्धेत अधिक सुरक्षित स्थितीत असून त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.

सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.

Advertisement
Tags :

.