भारताचा चीन तैपेईवर विजय
वृत्तसंस्था/अहमदाबाद
17 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या एएफसी आशाय चषक पात्र फेरी स्पर्धेतील झालेल्या सामन्यात दलालमुन गंगटेच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने चीन तैपेईच्या 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या मोहीमेत भारताचा हा पहिला विजय आहे. गेल्या शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात भारताने पॅलेस्टीनला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. चीन तैपेईने या सामन्यात चौथ्या मिनिटाला चीन तैपेई संघातील यांग क्विने उजव्या बगलेतून येईला पास दिला आणि हेईने चीन तैपेईचे खाते उघडले. भारतीय गोलरक्षक राजरूप सरकारला हेईचा हा फटका अडविताना आला नाही. भारतीय संघातील खेळाडूंनी 20 व्या मिनिटांपासून सामन्यावर आपली पकड ठेवण्यास प्रारंभ केला. 32 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर कर्णधार गंगटेने शानदार गोल करुन आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर भारताच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी चेंडूवर आपला ताबा अधिक वेळ राखला.