For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या विजयाला ‘ग्रहण’, मेलबर्न कसोटी रोमांचक स्थितीत

06:58 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या विजयाला ‘ग्रहण’   मेलबर्न कसोटी रोमांचक स्थितीत
Advertisement

मेलबर्न कसोटी रोमांचक स्थितीत :  ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 228 धावा, चौथ्या दिवसअखेर 333 धावांची आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेला चौथा सामना रोमांचक मोडवर आला आहे. मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड यांनी भारताच्या विजयाला ‘ग्रहण’ लावले. चौथ्या दिवसअखेरीस, बोलंड आणि लियॉन यांनी शेवटच्या विकेटसाठी 110 चेंडूत नाबाद 55 धांवांची भागीदारी करून संघाला 9 बाद 228 धावांपर्यंत पोहचवले आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या घातक गोलंदाजी केली, पण नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलंड यांनी भारताच्या आनंदावर विरजण घातले. कांगारुंकडे आता 333 धावांची आघाडी असून लियॉन 41 तर बोलँड 10 धावावर खेळत आहेत. सामन्याचा आजचा शेवटचा दिवस असून सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

चौथ्या दिवसाची सुरुवात भारताच्या दुसऱ्या डावाने झाली. तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 9 गडी गमावत 358 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रे•ाr क्रीजवर उपस्थित होते. भारतीय संघाने चौथ्या दिवशी पहिल्या डावात केवळ 11 धावा जोडल्या. संघाची 10 वी विकेट नितीश रे•ाrच्या रुपाने पडली. नितीशने 189 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 114 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या व ऑस्ट्रेलियाला 105 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

बुमराह-सिराजचा पुन्हा धमाका, कांगारुंच्या शेवटच्या शेपटाने फोडला घाम

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर सॅम कॉन्स्टास अवघ्या 8 धावा करून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आऊट झाला. उस्मान ख्वाजा (21) ही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांच्यात 37 धावांची भागीदारी झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 80 अशी होती. यानंतर संघाने 11 धावा करताना चार विकेट गमावल्या. स्मिथला सिराजने बाद केले. यानंतर बुमराहने त्याच षटकात हेड (1) आणि मार्श (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीही 2 धावा करुन बुमराहच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. यावेळी कांगारुंची 6 बाद 91 अशी स्थिती होती.

या कठीण स्थितीत लाबुशेन व पॅट कमिन्स यांनी 57 धावांची भागीदारी साकारली. या दरम्यान लाबुशेनने आपले अर्धशतक पूर्ण करताना 139 चेंडूत 3 चौकारासह 70 धावा फटकावल्या. लाबुशेनचा अडथळा सिराजने दूर केला तर मिचेल स्टार्कही 5 धावा करुन धावबाद झाला. कमिन्सला जडेजाने 41 धावांवर तंबूत पाठवले. टीम इंडियाने 173 धावांत कांगारुंच्या 9 विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघ 200 धावांचा टप्पाही पार करु शकणार नाही, असे वाटत होते. पण, लायन आणि बोलंड या कांगारुच्या शेपटाने भारताचे सर्वाधिक नुकसान नुकसान केले. या दोघांनी मिळून सुमारे 18 षटके खेळताना 55 धावांची भागीदारी साकारली व दिवसअखेर संघाला 9 बाद 228 धावापर्यंत नेले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लियॉन 41 तर स्कॉट बोलँड 10 धावांवर खेळत होते. भारताकडून बुमराहने 4 तर सिराजने 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 474 व दुसरा डाव 82 षटकांत 9 बाद 228 (उस्मान ख्वाजा 21, लाबुशेन 70, पॅट कमिन्स 41, लियॉन नाबाद 41, बोलँड नाबाद 10, बुमराह 4 तर सिराज 3 बळी)

भारत पहिला डाव 119.3 षटकांत सर्वबाद 369 (यशस्वी जैस्वाल 82, केएल राहुल 24, विराट कोहली 36, नितीश कुमार रे•ाr 114, वॉश्ंिाग्टन सुंदर 50, कमिन्स, बोलँड व लियॉन प्रत्येकी तीन बळी).

बुमराहचे विकेट्सचे ‘दुहेरी शतक’, अनेक विक्रमांचा कारनामा

  1. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमधील आपला 200 बळींचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आऊट करून त्याने ही खास कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते भारतीय गोलंदाजाने केले आहे. कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे. बुमराहने 44 कसोटीत ही कामगिरी साकारली आहे. पण, सर्वात कमी सरासरीने 200 बळी घेण्याच्या बाबतीत त्याने पहिले स्थान मिळवले आहे.

कसोटीत 200 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची सरासरी

जसप्रीत बुमराह - 19.5 सरासरी

मॅल्कम मार्शल - 20.9 सरासरी

जोएल गार्नर - 21.0 सरासरी

कर्टली एम्ब्रोस - 21.0 सरासरी

  1. याशिवाय, जसप्रीत बुमराह सर्वात कमी चेंडूत 200 कसोटी बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस, डेल स्टेन आणि कागिसो रबाडा या महान खेळाडूंच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे.

सर्वात जलद 200 कसोटी बळी (चेंडूद्वारे)

वकार युनूस - 7725

डेल स्टेन - 7848

कागिसो रबाडा - 8153

जसप्रीत बुमराह - 8484

  1. जसप्रीत बुमराह हा भारताकडून सर्वात कमी कसोटी सामन्यात 200 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने 44 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. आर. अश्विन 39 सामन्यांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजानेही 44 कसोटीत 200 बळी घेण्याची किमया केली आहे पण तो तिसऱ्या स्थानावर आहे.

सॅम कॉन्स्टासच्या दांड्या गुल, बुमराहचे हटके सेलिब्रेशन

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात सॅम कॉन्स्टासने बुमराहला चोपले होते. याशिवाय इतर भारतीय गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सहाव्या षटकात बुमराहने कॉन्स्टाससाठी सेटअप तयार केला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला चकवले. तर दुसरा चेंडू त्याने बाहेरच्या दिशेने टाकला पण तिसरा चेंडू इन-स्विंग होता. ज्याचा सामना कॉन्स्टासला करता आले नाही आणि स्टंप उडले. विकेट घेतल्यानंतर बुमराहने हटके सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

जैस्वालच्या तीन चुका टीम इंडियाला पडल्या महागात

चौथ्या दिवशी खेळाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत यशस्वी जैस्वालने एकूण 3 झेल सोडले. यशस्वीने प्रथम उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. यानंतर त्याने मार्नस लाबुशेन आणि पॅट कमिन्सचाही सोपे झेल घेतला नाही. मेलबर्नच्या मैदानावर चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर पूर्ण दबाव कायम ठेवला होता, तर दुसरीकडे यशस्वीच्या खराब क्षेत्ररक्षणावर कर्णधार रोहित आणि विराट कोहली या दोघांचाही राग पाहायला मिळाला. तीन झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दोनशेचा टप्पा गाठता आला.

Advertisement
Tags :

.