महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतासमोर आज मालिका जिंकण्याचे लक्ष्य

06:58 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिसरी टी-20 लढत आज, सूर्यकुमार यादवकडून चांगल्या खेळीची अपेक्षा 

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

भारताचा तिसरा टी-20 सामना आज मंगळवारी येथे होणार असून त्यात इंग्लंडविऊद्धची मालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवून भारतीय संघ मैदानात उतरेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवकडून दीर्घकाळ झालेल्या खराब कामगिरीनंतर या सामन्यात त्याने पुन्हा एकदा सुरात येऊन आक्रमक कामगिरी करावी, अशी अपेक्षा असेल.

गेल्या वर्षी सूर्यकुमारने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून भारताने फारशी चूक केलेली नाही, पण त्याचा फॉर्म खालावला आहे. मागील वर्ष जगातील या सर्वोत्तम टी-20 फलंदाजासाठी सर्वांत कमी उत्पादक ठरून त्याला 17 डावांमध्ये 26.81 च्या सरासरीने 429 धावा काढता आल्या होत्या. सूर्यकुमारने 2021 मध्ये 35 च्या जवळपास सरासरीने धावा केल्या होत्या. ते त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले वर्ष होते. त्यानंतरच्या दोन वर्षांत त्याची सरासरी 45 पेक्षा जास्त राहिली होती.

 

मुंबईचा हा 34 वर्षीय खेळाडू इंग्लंडविऊद्धच्या या मालिकेत अद्याप चांगली कामगिरी करू शकलेला नाही आणि एकदिवसीय सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळलेले असल्याने त्याला स्वत:स सिद्ध करून दाखवावे लागेल. तो भारताचा स्वत:चा ’मिस्टर 360’ असला तरी, मागील सामन्यात त्याने चेंडू यष्ट्यांवर ओढवून घेतला, तर मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्यात संथ चेंडूवर आपला नेहमीचा पिक अप शॉट हाणण्याचा प्रयत्नात तो बळी पडला. चेन्नईमध्ये तिलक वर्माच्या वैयक्तिक प्रतिभेमुळे भारताला विजय मिळाला, पण या सामन्यात सूर्यकुमारच्या खराब कामगिरीच्या व्यतिरिक्त संजू सॅमसनच्या आखडू टप्प्याच्या चेंडूवरील कमतरताही अधोरेखित झाल्या.

दक्षिण आफ्रिकेत संस्मरणीय मालिका खेळलेला सॅमसन या मालिकेत दोनदा जोफ्रा आर्चरच्या आखडू टप्प्याच्या चेंडूवर बाद झालेला आहे. राजकोटच्या खेळपट्टीवर तो यात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न करेल. या खेळपट्टीवर सहसा भरपूर धावा निघतात आणि पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय पुन्हा बाजी मारण्यास सिद्ध असतील. आर्चर आणि मार्क वूड यांनी भारतीय फलंदाजांसमोर काही आव्हाने उभी केलेली असली, तरी वेगवान गोलंदाजीविरुद्ध पूर्णपणे आरामात खेळताना तिलक वर्मा हा एकच खेळाडू दिसलेला आहे. चेपॉकवर आर्चरला त्याने हाणलेला पिकअप शॉट त्याच्या दर्जाबद्दल बरेच काही सांगून गेला.

रिंकू सिंग आणि नितीशकुमार  रेड्डीदुखापतींमुळे अनुपलब्ध असल्याने शिवम दुबे किंवा रमणदीप सिंग यांच्यापैकी एकाला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. टी-20 विश्वचषकादरम्यान मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांवर आक्रमण करण्याचे काम दुबेवर सोपवण्यात आले होते. तो आदिल रशिदच्या लेगस्पिनविऊद्ध उपयुक्त ठरू शकतो. आतापर्यंत संघात अर्शदीप सिंग हा एकमेव वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि हार्दिक पंड्या त्याला साथ देत आला आहे. संघ व्यवस्थापन ही रचना कायम ठेवण्याची शक्यता आहे.

आठ फलंदाजांसह खेळण्यास प्राधान्य देणारा भारत मधल्या षटकांमध्ये मारा करण्याच्या बाबतीत रवी बिश्नोई आणि वऊण चक्रवर्ती यांच्यावर अवलंबून आहे आणि चेन्नईमध्ये त्यांनी पाच फिरकी पर्यायांचा वापर केला. दुसरीकडे, पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेला इंग्लंड फलंदाजीत बरीच सुधारित कामगिरी करण्याची आशा करेल. कर्णधार जोस बटलर आतापर्यंत इंग्लंडचा सर्वांत आत्मविश्वासपूर्ण फलंदाज दिसलेला आहे, तर इतरांना दर्जेदार फिरकी गोलंदाजीविऊद्ध संघर्ष करावा लागला आहे. गेल्या सामन्यात जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी क्षमता दाखवलेली असून ते ही कामगिरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.

गोलंदाजीच्या बाबतीत आर्चर सुऊवातीभ्प् बळी मिळविण्याचे लक्ष्य ठेवेल, पण त्याच वेळी तो धावांचा ओघ रोखण्याचाही प्रयत्न करेल. कारण त्याने चेन्नईमध्ये चार षटकांत 60 धावा दिल्या. लेगस्पिनर आदिल रशिदने नेहमीप्रमाणे जास्त धावा दिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत इंग्लंडच्या फलंदाजीने पुढे येऊन प्रभावी कामगिरी करणे आवश्यक आहे.

संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रमणदीप सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, साकिब मेहमूद, फिलिप सॉल्ट, मार्क वूड.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article