For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची अफगाणिस्तानविरुद्ध ‘टी-20’ मालिका आजपासून

06:58 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताची अफगाणिस्तानविरुद्ध ‘टी 20’ मालिका आजपासून
Advertisement

सारे लक्ष रोहित शर्मावर केंद्रीत, विराट कोहलीची पहिल्या लढतीतून वैयक्तिक कारणांस्तव माघार

Advertisement

वृत्तसंस्था/ मोहाली

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ‘टी-20’ मालिका आज गुरुवारी या ठिकाणी होणाऱ्या सामन्याने सुरू होत असून यावेळी रोहित शर्माच्या पुनरागमनावर लक्ष केंद्रीत होईल. कारण त्याचा दीर्घकाळचा सहकारी विराट कोहलीने अफगाणिस्तानविऊद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. मात्र कोहली दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी उपलब्ध असेल. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मीडियाला संबोधित करण्यापूर्वी कोहलीने पहिल्या लढतीतून अंग काढून घेण्यामागे कौटुंबिक कारणे असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

दोन्ही दिग्गज खेळाडू 14 महिन्यांनंतर क्रिकेटच्या या सर्वांत लहान प्रकारांत परतत आहेत आणि तीन सामन्यांच्या मालिकेत ते कशी कामगिरी करतात त्याकडे उत्सुकतेने पाहिले जाईल. कारण जूनमध्ये अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वीची ही भारताची शेवटची मालिका आहे. या मालिकेमुळे ‘आयसीसी’च्या त्या महत्त्वपूर्ण स्पर्धेआधी भारताची स्थिती नेमकी काय आहे ते अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. तथापि, विश्वचषकापूर्वी होणाऱ्या ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या आधारे अंतिम 15 खेळाडूंची निवड केली जाईल.

अफगाणिस्तानविऊद्ध रोहित शर्मा हा यशस्वी जैस्वालसोबत फलंदाजीची सुऊवात करेल, असे द्रविडने सांगितले आहे. कोहली संघात परतणे निश्चित असून तो आणि रोहित हे अफगाणिस्तानविऊद्धच्या सामन्यांचा जास्तीत जास्त लाभ उठविण्याचा प्रयत्न करतील. अफगाणिस्तानच्या संघाला त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज रशिद खानशिवाय उतरावे लागेल. खान याच्या पाठीवर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि तो अजूनही त्यातून पूर्ण सावरलेला नाही.

रशिद खान पूर्णपणे तंदुऊस्त झालेला नाही. मालिकेत त्याची उणीव जाणवेल. पण आम्ही रशिदविनाही संघर्ष करू. एखाद्याने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे, असे अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झद्रानने मालिकेतील पहिल्या लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले. सदर उणीव संघातील इतर खेळाडू भरून काढण्याचा प्रयत्न करतील, अशी त्याला आशा आण्s.

तथापि, या मालिकेत लक्ष रोहितवर असेल. तो संघाचा कर्णधार देखील असून एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात दाखवल्याप्रमाणे या मालिकेतही पॉवरप्लेमध्ये त्याच्याकडून अतिआक्रमक दृष्टिकोनानची अपेक्षा केली जाईल. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून परतलेला संघ बुधवारी संध्याकाळी या मालिकेसाठी एकत्र आला. दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या बरोबरीत राहिलेल्या मालिकेत वरच्या फळीतील जबाबदारी व्यवस्थित पेलल्यानंतर जैस्वाल आणि तिलक वर्मा हे खेळाडू तसेच शुभमन गिलही संघात कायम राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत गिलला फारशी चमक दाखविता आली नाही आणि तो अफगाणिस्तानविऊद्ध भरपूर धावा जमविण्यास उत्सुक असेल.

टी-20 कारकिर्दीतील आपल्या सर्वांत कठीण परीक्षेला सामोरे जाताना रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीत आपली योग्यता सिद्ध केली आहे आणि मधल्या फळीत, विशेषत: सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दुखापतग्रस्त जोडीच्या अनुपस्थितीत तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. इशान किशनला वगळण्यात आले असून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे दोन यष्टिरक्षणासाठीचे पर्याय आहेत. मागील दोन मालिकांमध्ये यष्टिरक्षणाची जबाबदारी पेललेली असल्याने सॅमसनच्या तुलनेत जितेशला प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा आहे. सॅमसन गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या आयर्लंडमधील छोट्या मालिकेनंतर संघात परतलेला आहे.

शिवम दुबे देखील परतला असून वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी अंतिम संघात लागू शकते. तर वेगवान गोलंदाजीसाठी अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार हे तीन पर्याय उपलब्ध असतील. कुलदीप यादव फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल आणि रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या इतर पर्यायांतून निवड करावी लागेल. भारत मायदेशातील परिस्थितीत आरामात जिंकण्याची अपेक्षा असली, तरी अफगाणिस्तान त्यांना चांगलीच लढत देऊ शकतो.

अलीकडेच भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तानने सर्व अपेक्षा चुकवून जोरदार कामगिरी केली होती. रशिदचा अपवाद वगळता संघ पूर्ण ताकदीने या मालिकेत उतरणार आहे. कारण मुजीब झद्रान, नवीन-उल हक आणि फझलहक फाऊकी यांनी आपल्या क्रिकेट मंडळाकडील करारातील समस्या सोडविलेल्या आहेत.

संघ-भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, करिम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरिद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि रशिद खान.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.