For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची वस्तु निर्यातीत दमदार कामगिरी

06:20 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताची वस्तु निर्यातीत दमदार कामगिरी
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

एकंदर जागतिक अस्थिरता आणि लाल समुद्रात सुरू असलेल्या संकटाच्या काळातही मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी महिन्यात निर्यातीमध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण दुसरीकडे आयातदेखील वाढली आहे. मागच्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेमध्ये 3.12 टक्के निर्यातीमध्ये मागच्या महिन्यात वाढ झाली आहे.

याआधीच्या डिसेंबर महिन्यातदेखील वस्तूंची निर्यात 1 टक्के इतकी वाढली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकंदर वस्तुंची निर्यात मागच्या वर्षीच्या समानअवधीच्या तुलनेमध्ये 4.89 टक्के कमी राहिली आहे. मात्र दुसरीकडे यावर्षी जानेवारीत वस्तुंची आयात मागच्या जानेवारीच्या तुलनेत 2.99 टक्के वाढली आहे. सदरच्या महिन्यात 36.9 अब्ज डॉलर्सच्या वस्तुंची निर्यात करण्यात आली आहे. 54.4 अब्ज डॉलर्सच्या वस्तुंची आयात याच महिन्यात केली गेली आहे.

Advertisement

कोणत्या गोष्टी केल्या निर्यात

अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोलियम उत्पादने, प्लास्टिक आणि औषधे यासारख्या वस्तुंच्या निर्यातीत भारताची दमदार कामगिरी दिसून आली आहे. हॅण्डीक्राफ्टस्, लेदर, गार्मेंट व दागिन्यांच्या वस्तुंच्या निर्यातीत मात्र घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांना भारताने सर्वाधिक वस्तुंची निर्यात केली आहे.

Advertisement
Tags :

.