महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी विजय

06:58 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामन्यासह मालिकाही 3-1 फरकाने जिंकली : आफ्रिकेवर 135 धावांनी मात : तिलक वर्मा सामनावीर - मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग

Advertisement

जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर तिलक वर्मा व संजू सॅमसन यांच्या अफलातून शतकी खेळीच्या जोरावर भारताने चौथ्या टी 20 सामन्यात द.आफ्रिकेवर 135 धावांनी विक्रमी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3-1 फरकाने टी 20 मालिकेत यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 1 गडी गमावत 283 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन संघ 148 धावांत ऑलआऊट झाला. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल व वरुण चक्रवर्तीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाज फेल ठरले. विशेष म्हणजे,   शुक्रवारी टीम इंडियाचा यंदाच्या वर्षातील शेवटचा टी 20 सामना होता. या संपूर्ण वर्षात भारताने एकही मालिका गमावलेली नाही हे विशेष. आफ्रिकेला घरच्या मैदानावर 135 धावांनी नमवत या वर्षाचा शेवट गोड केला. प्रारंभी, जोहान्सबर्गच्या वॉडरर्स स्टेडियमवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो संघासाठी अतिशय योग्य ठरला. सलामीवीर संजू सॅमसन व अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 73 धावांची भागीदारी केली. पण, फटकेबाजीच्या प्रयत्नात अभिषेक 36 धावांवर सिम्पालाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

संजू-तिलकची विक्रमी शतके

अभिषेक बाद झाल्यानंतर संजूने तिलक वर्मासोबत 86 चेंडूत 210 धावांची नाबाद भागीदारी साकारली. या जोडीने आफ्रिकन गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. सॅमसनने 56 चेंडूत 6 चौकार व 9 षटकारासह 109 धावांची शानदार खेळी केली तर तिलकने 47 चेंडूत 9 चौकार व 10 षटकारासह 120 धावा फटकावल्या. संजूचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक होते, जे त्याने गेल्या 5 सामन्यांमध्ये झळकावले आहे. दुसरीकडे, तिलक वर्माचे हे दुसरे शतक होते. या मालिकेतही त्याने सलग दोन्ही शतके झळकावली आहेत. या दोन्ही शतकांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 1 गडी गमावत 283 धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाकडून या डावात 17 चौकार व 23 षटकारांचा पाऊस पाडण्यात आला.

होम ग्राऊंडवर आफ्रिकेचे सपशेल लोटांगण

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 284 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. डावातील पहिल्याच षटकात रिझा हेंड्रिक्सला अर्शदीपने बाद केले. हेंड्रिक्सला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर पुढील षटकात हार्दिक पंड्याने रिकल्टनला तंबूचा रस्ता दाखवला तर तिसऱ्या षटकात कर्णधार मॅरक्रम व आक्रमक फलंदाज क्लासेनला अर्शदीपने बाद करत आफ्रिकेची 4 बाद 10 अशी बिकट अवस्था केली. यानंतर ट्रिस्टन स्टब्ज व मिलर या दोघांनी 86 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. स्टब्जने सर्वाधिक 43 तर मिलरने 36 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने आफ्रिकन फलंदाज बाद होत गेले व त्यांचा डाव 18.2 षटकांत 148 धावांत संपुष्टात आला. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने 3 तर वरुण चक्रवती व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत विजयात मोलाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 1 बाद 283 (संजू सॅमसन 56 चेंडूत 6 चौकार व 9 षटकारासह नाबाद 109, अभिषेक शर्मा 36, तिलक वर्मा 47 चेंडूत 9 चौकार व 10 षटकारासह नाबाद 120, सिम्पाला 1 बळी).

द.आफ्रिका 18.2 षटकांत सर्वबाद 148 (रिकल्टन 1, हेंड्रिक्स 0, मॅरक्रम 8, ट्रिस्टन स्टब्ज 43, क्लासेन 0, मिलर 36, कोएत्झी 12, यान्सेन नाबाद 29, अर्शदीप सिंग 3 बळी, वरुण चक्रवर्ती व अक्षर पटेल प्रत्येकी 2 बळी, हार्दिक, रमणदीप व रवि बिश्नोई प्रत्येकी एक बळी).

तिलक वर्माचे सलग दुसरे शतक

तिलक वर्माने जोहान्सबर्गमध्ये अवघ्या 41 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. या सामन्यात त्याने एकूण 47 चेंडूंचा सामना करत 120 नाबाद धावा केल्या. या खेळीसह तिलकने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलग दोन टी 20 सामन्यांमध्ये शतके ठोकणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी संजू सॅमसनने ही कामगिरी केली होती. यासोबतच हा विक्रम करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी फिल सॉल्ट, गुस्ताव मॅकन आणि रिले रुसो यांनीही टी 20 मध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत.

संजू सॅमसनचे विक्रमी तिसरे शतक

सलामीवीर सॅमसनने द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात शानदार फलंदाजी करत 51 चेंडूत शतक झळकावले. सॅमसनने पहिल्या सामन्यातही शतक झळकावले होते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत आणखी एक शतक झळकावले. सॅमसनचे टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. यष्टिरक्षकांमध्ये सर्वाधिक टी 20 शतके करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे.

भारताची आफ्रिकेविरुद्ध सर्वोच्च तर टी 20 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या सामन्यात भारतीय संघाने 1 गडी बाद 283 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2 ऑक्टोबर 2022 रोजी 3 विकेट्सवर 237 धावा केल्या होत्या. याशिवाय, भारताची ही टी 20 क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. याआधी यंदाच्या वर्षी हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध 297 धावांची वादळी खेळी केली होती. ही भारताची टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article