For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या नव्या घातक ड्रोनचे सादरीकरण

06:14 AM Feb 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या नव्या घातक ड्रोनचे सादरीकरण
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने एरो इंडिया 2025 मध्ये नवा ड्रोन सादर केला असून तो शत्रूसाठी अत्यंत घातक ठरणारा आहे. हा कॅट्स क्लासचा ड्रोन असून तो टेहळणी, हेरगिरी आणि सामान्य हल्ला अन् आत्मघाती हल्ला करण्यास सक्षम आहे. 100-170 किलोमीटरच्या कक्षेपर्यंत हा ड्रोन विध्वंस घडवून आणू शकतो.

या एकाच ड्रोनद्वारे अनेक प्रकारची कामे पूर्ण करता येणार आहेत. हा ड्रोन लढाऊ विमानाला जोडल्यावर रेंज, अचूकता आणि मारक क्षमता आणखी वाढणार आहे. हा ड्रोन पुढील एक-दोन वर्षांमध्ये तयार होणार असून याचे नाव कॅट्स म्हणजेच कॉम्बॅट एअर टीमिंग सिस्टीम आहे. या ड्रोनची निर्मिती केवळ हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून होत नसून डीआरडीओ आणि अन्य दोन संस्था देखील याच्या निर्मितीकार्यात सामील आहेत. भविष्यात या ड्रोनचा वापर वायुदल तसेच नौदल करणार आहे. कॅट्सचे चार वेरिएंट्स तयार केले जाणार आहेत. कॅट्स वॉरियर, कॅट्स हंटर, कॅट्स अल्फा आणि कॅट्स इन्फिनिटी असे हे वेरिएंट्स असतील.

Advertisement

कॅट्स वॉरियर

कॅट्स वॉरियर ड्रोनमध्ये पीटीएई-7 ट्विन टर्बोजेट इंजिन लावण्या तआले असून हा ड्रोन 2-4 फॉर्मेशन करत हल्ला करतो. हा स्टेल्थ ड्रोन आहे, म्हणजेच तो रडारला चकवा देऊ शकतो. या ड्रोनची उ•ाण कक्षा 150 किलोमीटर असून तो टेहळणी, हेरगिरी, हल्ला आणि आत्मघाती हल्ला करण्यास सक्षम आहे. आत्मघाती मोहिमेवर याची कक्षा वाढवून 700 किलोमीटर करता येणार आहे. या ड्रोनमधून दोन कॅट्स अल्फा ड्रोन देखील पाठविले जाऊ शकतात. हे दोन्ही ड्रोन्स शत्रूवर अस्त्र डागून परत येऊ शकतात. एचएएल या ड्रोनसाटी 390 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.

कॅट्स हंटर

या ड्रोनचे वजन 600 किलोग्रॅम असून यात पीटीएई-7 इंजिन आहे. याचे डिझाइन क्षेपणास्त्राप्रमाणे करण्यात आले आहे. हा स्टँडऑफ एअर लाँच्ड क्रूज क्षेपणास्त्रसारखा डागला जाईल. भारतीय वायुदल स्वत:ची लढाऊ विमाने मिराज-2000, जग्वार किंवा सुखोई-30 एमकेआयमध्ये हे जोडले जाऊ शकते. याचे पंख वळू शकतात, हा ड्रोन 250 किलोग्रॅम वजनाचे अस्त्र वाहून नेऊ शकतो. हा ड्रोन आत्मघाती अस्त्र ठरू शकतो. याची कक्षा 200-300 किलोमीटर असून एकदा लक्ष्यावर बॉम्ब पाडविल्यावर तो परत देखील येऊ शकतो.

कॅट्स अल्फा

कॅट्स अल्फा स्वार्म अटॅकसाठी तयार करण्यात आला असून त्याला एअर लाँच्ड फ्लेक्सिबल असेट स्वार्म नावाने ओळखले जाते. हे आत्मघाती अस्त्र असून ते ग्लाइड करत 100 किलोमीटरच्या कक्षेपर्यंत पोहोचू शकते. हा ड्रोन 5-8 किलोग्रॅम विस्फोटके वाहून नेत 100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने शत्रूवर हल्ला  करू शकतो. हा ड्रोन सुमारे 2 मीटर लांब असून याचे वजन 25 किलोग्रॅम आहे.  हा ड्रोन लढाऊ विमानात जोडला जाऊ शकतो. जग्वारमध्ये 24 एएलएफए-एस आणि सुखोईमध्ये 30-40 अल्फा ड्रोन डागले जाऊ शकतात.

कॅट्स इन्फिनिटी

या प्रकारातील ड्रोन न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नोलॉजीकडून विकसित केला जात आहे. हा  हायअल्टीट्यूड सूडो सॅटेलाइटप्रमाणे वापरला जाईल. हा ड्रोन 70 हजार फुटांच्या उंचीवर तीन महिन्यांपर्यंत सातत्याने उ•ाण करू शकणार आहे. याचे वजन 500 किलोग्रॅम असेल. या ड्रोन अत्यंतउंचीवरून टेहळणी करू शकणार आहे. याच्या पंखांचा आकार 50 मीटर असेल. क्रूज स्पीड 90-100 किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. याचे मुख्य काम हेरगिरी अन् टेहळणी असेल. भविष्यात या ड्रोनला हल्ला करण्यासाठी देखील तयार केले जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.