कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा इंग्लंडवर निसटता विजय

06:00 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / झिमेन (चीन)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या ड गटातील लढतीत भारताने इंग्लंडचा 3-2 अशा फरकाने निसटता पराभव केला. या स्पर्धेत भारताचे उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न यापूर्वीच संपुष्टात आले आहे.

Advertisement

सदर स्पर्धेमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाला सलामीच्या लढतीत डेन्मार्कने 4-1 अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर अलिकडेच झालेल्या ड गटातील दुसऱ्या सामन्यात बलाढ्या इंडोनेशियाने भारताचे आव्हान 4-1, 4-1 असे संपुष्टात आणले. या गटातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही लढत केवळ औपचारिकच होती. ड गटातून इंडोनेशिया आणि डेन्मार्क हे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्याच प्रमाणे या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघातून उर्वरित प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.

भ्घरत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीत महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या अनुपमा उपाध्यायने इंग्लंडच्या मियु लीन निगेनचा 21-12, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 41 मिनिटे चालला होता. पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या सतीशकुमार करुणाकरनने इंग्लंडच्या हॅरी हुआंगचा 18-21, 22-20, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करुन आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. महिलांच्या दुहेरीच्या सामन्यात भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि श्रुती मिश्रा यांनी इंग्लंडच्या टोलमन आणि लियुवेन यांच्यावर 21-17, 21-17 अशा गेम्समध्ये मात केली. मात्र त्यानंतर शवटचे दोन सामने भारताला गमवावे लागले. पुरुष दुहेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या इस्टॉन आणि ग्रीन यांनी भारताच्या हरिहरन व रुबेनकुमार यांचा 21-14, 11-21, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 52 मिनिटे चालला होता. शेवटच्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या हेमींग आणि लियुवेन यांनी करुणाकरन व तनिषा क्रेस्टो यांचा 21-11, 13-21, 24-22 असा पराभव केला. अखेर भारताने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article