महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची लढत स्वीडनविरुद्ध

06:15 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विश्व गट 1 लढतीचे आयोजन सप्टेंबरमध्ये

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येत्या सप्टेंबरमध्ये भारताची विश्व गट एक मधील डेव्हिस चषक स्वीडनविरुद्ध त्यांच्याच देशात होणार आहे. गेल्या आठवड्यात इस्लामाबाद येथे झालेल्या विश्व गट एक प्लेऑफ लढतीत भारताने पाकचा 4-0 असा पराभव करून विश्व गट एकमध्ये स्थान मिळविले. स्वीडनला मात्र क्वालिफायर पहिल्या राऊंडमध्ये ब्राझीलकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारत व स्वीडन यांच्यात याआधी पाचवेळा गाठ पडली असून भारताने एकदाही त्यांच्यावर विजय मिळविलेला नाही. मात्र यावेळी ही कसर भरून काढण्याची भारताला चांगली संधी आहे. कारण स्वीडनकडे भीतिदायक वाटावा असा एकेरीचा एकही खेळाडू नाहीय. यापूर्वी 2005 मध्ये भारत व स्वीडन यांच्यात शेवटची लढत झाली होती. दिल्लीत झालेली ही लढत स्वीडनने 3-1 अशी जिंकली होती.

स्वीडन संघात इलियास वायमर हा अत्यंत प्रतिभावान टेनिसपटू असून तो जागतिक क्रमवारीत 160 व्या स्थानावर आहे तर भारताकडे सुमित नागल हा प्रमुख खेळाडू असून तो 121 व्या क्रमांकावर आहे. जर तो या लढतीसाठी उपलब्ध झाला तर ही झुंज खूपच मनोरंजक ठरू शकेल. भारतीय डेव्हिस संघाचे कर्णधार रोहित राजपाल यांनी ड्रॉ वर समाधान व्यक्त केले. जोकोविचच्या सर्बियाविरुद्ध आपली लढत होईल, अशी त्यांनी अपेक्षा केली होती. ‘विदेशात खेळणे काहीसे कठीण जाते. कारण कोर्ट निवडण्याची त्यांना संधी असते. कोणत्या कोर्टवर ही लढत ठेवली जाणार यावर सर्व अवलंबून असेल. यापेक्षाही कठीण संघाविरुद्ध आम्हाला लढावे लागू शकले असते. पण आता मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,’ असे राजपाल म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article