For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा विकासदर 7 टक्के राहणार: एनसीएइआरचा अंदाज

06:29 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा विकासदर 7 टक्के राहणार  एनसीएइआरचा अंदाज
Advertisement

जीएसटी संकलन वाढीसह सकारात्मक स्थिती

Advertisement

नवी दिल्ली :

नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च (एनसीएइआर)यांनी केलेल्या पाहणी अहवालामध्ये भारताचा विकास दर 2024-25 करिता 7 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जागतिक स्तरावरती अस्थिर परिस्थिती असतानाही यंदा सामान्य मान्सून राहणार असल्याने चालू आर्थिक वर्षाकरिता भारतीय अर्थव्यवस्था ही सात टक्क्यांनी सदृढ राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

एप्रिल 2024 च्या मासिक आर्थिक सर्वेक्षणासंदर्भातील अहवाल सादरीकरणावेळी एनसीएइआरने ही माहिती दिली आहे. जीएसटी संग्रहामध्ये झालेली वाढ, ऊर्जा वापरामध्ये झालेली वाढ, मालवाहतुकीमध्ये सकारात्मक परिस्थिती या पार्श्वभूमीवर पाहता भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबुतीच्या दिशेने सरकताना दिसते आहे. या एकंदर सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच भारत 2024-25 आर्थिक वर्षामध्ये 7 टक्के इतका विकास दर साध्य करू शकतो, असे मत एनसीएइआरने व्यक्त केले आहे. वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी अंतर्गत मार्च महिन्यामध्ये 1.8 लाख कोटींची प्राप्ती सरकारला झाली आहे. जीएसटीची अंमलबजावणी 2017 पासून लागू झाली असून संग्रहात झालेली ही वाढ दुसरी सर्वात मोठी मानली जाते. याच दरम्यान 2024 च्या मार्चमध्ये यूपीआयच्या माध्यमातून भारतात 13 अब्ज व्यवहार झाले आहेत, जे आत्तापर्यंतचे सर्वाधिक असल्याचे मानले जाते.

Advertisement
Tags :

.